शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

समृद्ध महाराष्ट्रच्या ११६ विहिरी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:33 IST

मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे.हिंगोली जिल्ह्याला दहा हजार सिंचन विहिरींच्या कामांचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. यापैकी ९९७0 लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामसभेतून निवडले. ४0२२ जणांना प्रशासकीय मंजुरी दिली. तर २३९३ कामे चालू आहेत. यापैकी ११६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यात औंढा २0, हिंगोली-१५, कळमनुरी १३, सेनगावातील ६८ कामांचा समावेश आहे. वसमतमध्ये यातील एकही काम नाही. मग्रारोहयोत कामे करण्यास जशी पंचायत समित्यांची उदासीनता आहे, तशीच कामांचे नियमित अहवाल सादर करण्यासही उदासीनताच असल्याचे चित्र आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून वारंवार सूचना दिल्यानंतरही काहीच फरक पडत नाही. या योजनेतील कामे पूर्ण होत नसल्याची बोंब लोकप्रतिनिधी वारंवार करीत आहेत. मात्र तरीही याकडे लक्ष द्यायला पंचायत समित्यांना वेळ नसल्याचे दिसत आहे. मागील दोन वर्षांपासून कामे सुरू असताना पहिल्यांदा ११६ सिंचन विहिरी पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. तर शेततळ्यांचे ५६00 एवढे उद्दिष्ट असून ग्रामसभेत अवघे ५३२ लाभार्थी निवडले. त्यापैकी ३२२ कामांना प्रशासकीय मान्यता दिली मात्र एकही सुरू झाले नाही.भू-संजिवनी व्हर्मी कंपोस्टिंगच्या कामांचे २२00 एवढे उद्दिष्ट आहे. यात ६८७ लाभार्थी ग्रामसभेतून निवडले. ३७३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. ३ सुरू तर उर्वरित ठप्प आहेत. नाडेप कंपोस्टिंगमध्येही तेवढेच उद्दिष्ट असून मंजूर ७६८ पैकी १५ सुरू व २ पूर्ण झाली आहेत.हिंगोली : मान्यतेनंतरही कामे सुरू होईनातनिर्मल शौचालयाचे २२६ प्रस्ताव मंजूर असून १२0 कामे सुरू आहेत. केवळ ८ पूर्ण झाले आहेत. शोषखड्ड्यांच्या ८८१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरीही ४८७ कामे सुरू झाली होती. यापैकी ५0 पूर्ण झाली आहेत. अंकुर रोपवाहिकेच्या ६१ कामांना मंजुरी दिली होती. यापैकी ५६ कामे सुरू असून४ कामे पूर्ण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गाव तलावाचे तर एकही काम प्रस्तावित नाही. नंदनवन वृक्षलागवडीच्या योजनेत २३ कामांना मंजुरी दिली होती. १८ सुरू असून उर्वरित कामे अद्याप ठप्पच आहेत. असेच चित्र सगळीकडे दिसत आहे.याच योजनेत समृद्ध ग्राम योजनेत १६00 एवढे उद्दिष्ट आहे. २८८ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यापैकी १९ सुरू असून ९0 कामे पूर्ण झाली आहेत. तर १७९ कामे ठप्प आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार