याबाबत बीडीओंनी दिलेल्या पत्रात म्हटले की, ग्रामपंचायत कारवाडी येथील गंगानगर मधील मारोती मंदिराच्या समोरासमोर बुद्धविहार सामाजिक सभागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारची स्वतंत्र दलित वस्ती अथवा मागासवर्गीय वस्ती अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत हनुमान मंदिराजवळ हे सभागृह उभारू नये. तसेच सा.बां. विभागाकडून होत असलेले काम थांबवावे. अन्यथा परिसरात जातीय तेढ निर्माण होईल, असा अहवाल मिळाला होता. मात्र आता या प्रकरणात सहायक गटविकास अधिकारी जी.पी. बोथीकर, विस्तार अधिकारी व्ही.एस. भोजे, शाखा अभियंता एस. बी. गिते यांची चौकशी होत आहे. ७ सप्टेंबरपर्यंत चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्यास आदेशित केले आहे.
याठिकाणी उपोषणास बसलेल्या ज्योती धवसे, माला भगत, निलावती कदम, रमाबाई खिल्लारे, अंकिता भालेराव, आशा खंदारे, मंगल खंदारे, ताई खंदारे आदी महिलांना हे पत्र देण्यात आले. यावेळी मधुकर मांजरमकर यांची उपस्थिती होती.