शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक ! हिंगोलीतून लांब पल्ल्यावरील बससेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 16:45 IST

लांब पल्ल्यावरील बससेवा सुरू केल्याने प्रवाशांतून समाधान

ठळक मुद्देऐन सणासुदीत प्रवाशांची गैरसोय टळणार

हिंगोली : ऐन सणासूदीत प्रवाशांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे लांब पल्ल्यावरील बससेवा सुरू केली आहे. १८ सप्टेंबरपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली असून प्रवाशांतूनही माेठा प्रतिसाद  मिळत आहे. विशेष म्हणजे दीपावली व ईद सणानिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळातर्फे लांब पल्ल्यावरील बस सुरू करण्यात आल्या आहेत. 

सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाहतूक सेवा ठप्प हाेती, त्यात राज्य परिवहन महामंडळाची बससेवाही बंद असल्यामुळे प्रवाशांचे माेठे हाल झाले. परंतु आता शासनाकडून टप्याटप्याने शिथिलता दिली जात असून बससेवा सुरू केल्याने प्रवाशांची गैरसाेय दूर झाली आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे आता ऐन सणासुदीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता लांब पल्ल्यावरील बस सुरू केल्या आहेत, अशी माहिती परभणी येथील रा. प. विभाग नियंत्रक यांनी दिली. 

अशा धावतील लांब पल्ल्यावरील बसेस...सणासुदीत हिंगाेली आगारातून लांब पल्ल्यावरील बसेस धावणार आहेत. यामध्ये हिंगाेली-मुबंई मार्गे परभणी, पाथरी, माजलगाव, शेवगाव, अहमदनगर, चाकण ही लांब पल्ल्याची बससेवा हिंगाेली बसस्थानकातून दरराेज दुपारी ३ वाजता सुरू करण्यात आली असून, परभणी बसस्थानकावरून सुटण्याची वेळ सायंकाळी ५.१५ वाजता, व पाथरी बसस्थानकावरून सुटण्याची वेळ सायंकाळी ६.३० वाजता आहे. मुंबई येथून परत सुटण्याची वेळ सायंकाळी ६ वाजता आहे. तसेच इतर मध्यम लांब पल्ल्यावरील बससेवा प्रवाशांच्या साेयीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.हिंगाेली-मुंबई मार्गे परभणी, पाथरी दुपारी ३ वाजता तसेच हिंगोली-वर्धा सकाळी ६.१५, हिंगोली-कंधार सकाळी ८ वाजता मार्गे पूर्णा-चुडावा-पांगरी, जिंतुर-कंधार ८.३० वा. पूर्णा, चुडावा मार्गे तसेच हिंगोली-वाशिम दुपारी १ वाजता, हिंगोली-रिसोड मार्गे सेनगाव-पुसेगाव सकाळी ७ वाजता, पाथरी-औरंगाबाद सकाळी ९.३० वाजता मार्गे परतुर, परभणी-नांदेड मार्गे पूर्णा, लिंबगाव, चुडावा, सकाळी ७.३०, ८.३०, दुपारी १ वाजता २.३०, परभणी-औरंगाबाद सकाळी ६, ७, ८ दुपारी १२.३०, सायंकाळी ५.३० तसेच जिंतूर-यवतमाळ सकाळी ६ वाजता तसेच जिंतूर-वाशिम सकाळी ६.३० वाजता, परभणी-रिसोड सकाळी ६.३०, ८.१०, ११ तसेच दुपारी १ वाजता तसेच गंगखेड-औरंगाबाद मार्गे सिरसाळा सकाळी ७.३० वाजता या प्रमाणे बसफेऱ्यामध्ये वाढ केल्याची माहिती विभाग नियंत्रक मु.सु.जोशी यांनी दिली.

राज्य परिवहन महामंडळातर्फे सणासुदीत बससेवा सुरू केल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. परंतू रात्रीच्या सुमारास वाशिम मार्गे बस सुविधा सुरू करावी अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे. आता शासकीय कार्यालय तसेच इतर कामकाजाकरिता वाशिम ते हिंगोली यासह इतर मार्गावरूनही हिंगोलीत येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या मार्गावरही बससेवा सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.  

टॅग्स :state transportएसटीHingoliहिंगोलीtourismपर्यटन