विमा कंपनीने घेतली
डिग्रस: हिंगोली तालु्क्यातील डिग्रस परिसरातील नऊशे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा हेक्टरी नऊशेप्रमाणे विमा उतरविला होता. परंतु, विमा कंपनीने ज्यांचा सर्व्हे झाला आणि ज्या शेतकऱ्यांनी दावा दाखल केला, त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, अजूनही जवळपास चारशे शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे पैसे आले नाहीत. विमा कंपनीने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या खात्यावर पैसे टाकावेत, अशी मागणी होत आहे.
निवडणुकीचे वातावरण तापले
डिग्रस: हिंगोली तालुक्यातील डिग्रस येथील ग्रामपंचायत ओपन महिलासाठी राखीव झाली आहे. गावातील पॅनलप्रमुख गावात फिरुन उमेदवाराचा शोध घेत आहेत. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी राहील, याची व्यूहरचना आखत आहेत. एकंदर ग्रा. पं. चे वातावरण थंडीतही तापलेले पहायला मिळत आहे.