शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

कोरेगाव-भीमा घटनेप्रकरणी हिंगोलीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:39 IST

कोरेगाव भिमा येथील घटनेच्या निषेर्धात ४ जानेवारी आंबेडकरी अनुयायी जनतेच्या वतीने हिंगोलीत बंद पाळण्यात आला. यात व्यापाºयांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेवली. तर शाळा व महाविद्यालये बंद होती. शहरातील मुख्य मार्गावरून आंदोलन करत समाजबांधवांनी जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपती व सर्वाेच्च न्यायालयाला निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कोरेगाव भिमा येथील घटनेच्या निषेर्धात ४ जानेवारी आंबेडकरी अनुयायी जनतेच्या वतीने हिंगोलीत बंद पाळण्यात आला. यात व्यापाºयांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेवली. तर शाळा व महाविद्यालये बंद होती. शहरातील मुख्य मार्गावरून आंदोलन करत समाजबांधवांनी जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपती व सर्वाेच्च न्यायालयाला निवेदन दिले.हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर येथे गुरूवारी सकाळपासूनच आंबेडकरी पक्ष आणि सर्व संघटनांचे नेते, कार्यकर्ते तसेच पदाधिकारी जमा झाले होते. सकाळी ९.३० वाजता आंदोलकांनी शहर बंदसाठी आवाहन केले. मात्र त्याअगोदरच सर्वच दुकाने, अस्थापना, हॉटेल्स् बंद होत्या. शहरातील जवाहर रोड, टपाल कार्यालय, अकोला-नांदेड रोड, कोमटी गल्ली, कपडागल्ली आदी भागांतील दुकाने व सराफा बाजार बंद ठेवण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडूनही ध्वनिक्षेपाद्वकारे शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.सकाळी ११ वाजता संविधान कॉर्नर येथे जमलेले आंदोलकांचे सर्व जत्थे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निवेदन देण्यासाठी निघाले. काही संघटनांनी निवेदन देण्यासाठी ५ वाजता जाण्याची भूमिका घेऊन अग्रसेन चौकात रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनातील काही तरूणांच्या आक्रमक वागणुकीमुळे मात्र पोलिसांची धांदल उडाली होती. तसेच आंदोलकांची संख्या वाढत चालल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवून चौका-चौकात पोलीस जवान तैनात करण्यात आले. परंतु शहर बंदला प्रतिसाद मिळाल्याने कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनीही आंदोलकांना सहाकार्य करत शांततेचे आवाहन केले. शहरातील विविध मुख्य मार्गावर रस्तारोको आंदोलन केले. हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील समाजबांधवांनीही या घटनेबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. या निवेदनावर के. सी. भोरगे, आर. पी. ठोके, विद्याधर उचित, प्रकाश भोरगे, सतिष इंगोले, विजय बनसोडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.वाहतूक ठप्प : भोगाव पाटीवर रास्ता रोकोवसमत : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ परभणी- नांदेड, राष्टÑीय महामार्गावरील भोगाव पाटीवर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन तास राष्टÑीय महामार्गावरील वाहतुक ठप्प होती. यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याहोत्या. तब्बल दोन तास रहदारी ठप्प होती. दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. वाहतूक ठप्प असल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपती, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना निवेदन४जिल्हा प्रशासनाकडे दिले निवेदन - उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना निवेदन पाठवण्यात आले. निवेदनाद्वारे बुद्धभूषण राजे संभाजी यांचे वढू (बु.) येथे भव्य स्मारक बांधून त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, त्याच गावात संभाजी राजेंचा अंत्यविधी करणाºया गणपत गायकवाड यांचेही स्मारक बांधून त्याचा विकास करावा. कोरेगाव भिमा दंगलीतील गुन्हेगारांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी. कोरेगाव भिमा येथे हल्ला करण्यासाठी कट रचला जात असताना तसेच हल्ला होताना बघ्याची भूमिका घेत कोणतीही कारवाई न करणाºया पोलीस व गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाºयांसह आरोपी करून त्यांचे मोबाईल सीडीआर तपासून यातील सहभागी राजकीय नेत्यांवरही गुन्हे दाखल करावेत. आंबेडकरी आंदोलकांवर राज्यभरात आणि जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, कोरेगाव भीमा येथील गुन्हे जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शासन करावे आदी मागण्या केल्या. निवेदनावर दिवाकर माने, रवींद्र वाढे, मधुकर मांजरमकर, दिलीप भिसे, सुरेश वाढे, सुनील इंगोले, ज्योतिपाल रणवीर, राहुल खिल्लारे, योगेश नरवाडे, मलींद उबाळे, विक्की काशिदे, आशाताई उबाळे, अ‍ॅड. सुनील भुक्तार, प्रकाश इंगोले, अ‍ॅड. रावण धाबे, सदाशिव सूर्यतळ, जगजित खुराणा, सुनीता केदारे, पंचशिला रसाळ, तारा खंदारे, दीपक धांडे, दीपक सोनवणे, रमेश इंगोले, साहेबराव भोकरे, सुभाष ठोके, स्वप्निल इंगळे, नितीन घोडके, अक्षय इंगोले, मिलींद मोरे, आनंद खिल्लारे, शांताबाई मोरे, विलास कवाने, कैलास कांबळे, सुशांत मुंढे, आकाश वाघमारे, बंडू नरवाडे, विलास ठोेके, देवराव भगत, बबन भुक्तर यांच्यासह समाजबांधवांच्या स्वाक्षरी आहेत.