शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यावरून ग्रामसेवक आणि गावकऱ्यांत हाणामारी, सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील घटना

By यमेश शिवाजी वाबळे | Updated: September 22, 2022 14:33 IST

परस्परविरूद्ध फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदविण्यात आला.

हिंगोली (रमेश वाबळे) : गावातील सांडपाणी व घरकुलाच्या कारणावरून सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे ग्रामसेवक व काही गावकऱ्यात हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी २२ सप्टेंबर रोजी परस्परविरूद्ध फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदविण्यात आला.

सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील गोरेगाव मार्गावरील दैाडाच्या पाटाजवळ सांडपाणी व घरकुलाच्या कारणावरून ग्रामसेवक भुजंग सोनकांबळे यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार सुनील दत्तराव इंगोले यांनी पोलीस ठाण्यात दिली. यामध्ये सुनील यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ग्रामसेवक सोनकांबळे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

याच प्रकरणात ग्रामसेवक भुजंग शेषराव सोनकांबळे यांनी तक्रार दिली आहे. यामध्ये सोनकांबळे हे २१ सप्टेंबर रोजी  सायंकाळी ग्रामपंचायतमधील कामकाज आटोपून दुचाकी वाहनावर घराकडे निघाले असता कडोळी ते गोरेगाव मार्गावर दौडाच्या पाटा जवळ गावातील सुनील दत्तराव इंगोले, नागेश दत्तराव इंगोले, किसन बंडू इंगोले, गजानन तुळशीराम इंगोले, राजू तुळशीराम इंगोले, रवींद्र उर्फ दलीत चोखाजी जाधव, सोनु दत्तराव इंगोले, अनिल दत्तराव इंगोले व इतर पाच जणांनी त्यांची दुचाकी अडवली. गोरेगाव पोलीस ठाण्यात १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केलेला गुन्हा मागे घे तसेच घरकुलाचा अहवाल दे या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत ग्रामसेवक सोनकांबळे यांच्या पाठीला दुखापत झाली. या प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार मैदकर, गजानन बेडगे करीत आहेत.