शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जमीन तापत असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये; तहसीलदारांनी काढले आदेश

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: July 8, 2023 11:44 IST

‘लोकमत’ वृत्ताची दखल घेऊन लक्ष्मण नाईक तांडा परिसरात पथकाने केली पाहणी

- महेबूबखाँ पठाणशिरड शहापूर (जि. हिंगोली): औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथील माळारानावरील जमीन तापून त्यामधून धूर निघत आहे. ही बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच भूजल सर्वेक्षण विभाग व भूगर्भशास्त्र विभागाच्या पथकाने ७ जुलै रोजी लक्ष्मण नाईक तांडा येथे जाऊन पाहणी केली. या परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असे आदेश तहसीलदार हिमालय घोरपडे यांनी दिले आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा शिवारातील माळरानात एका लोखंडी खांबाजवळ दहा बाय दहा एवढ्या आकाराच्या जमिनीतून अचानक धूर निघत आहे. तसेच तेथील जमीन तापत आहे. त्यातून धूर निघत असल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तहसीलदार घोरपडे, रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागाच्या डॉ. कदम, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी रवींद्र मांजरमकर, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मंडळ अधिकारी सुरेश बोबडे, तलाठी एम. एफ. फोपसे, सरपंच ज्योती रवींद्र पवार, महावितरण वीज कंपनीचे सहायक अभियंता आश्विनकुमार मेश्राम, नितेश कुलकर्णी आदींनी लक्ष्मण नाईक तांडा येथे जाऊन पाहणी केली.

नागरिकांनी जमीन तापते तिथे जाऊ नये...पथकाने घटनास्थळावरून काळे पडलेले दगडांचे नमुने तपासणीसाठी घेतले. हा प्रकार का घडत आहे? याची माहिती होईपर्यंत या परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असे आदेश तहसीलदार घोरपडे यांनी काढले आहेत, तसेच परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही तहसीलदार व पथकाने केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीEarthquakeभूकंप