शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल पाठलाग; तीन संशयित पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:52 IST

गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांनी वैतागलेल्या बाळापूर पोलिसांनी तीन संशयितांना पीकअप गाडीसह अटक केली आहे. मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास ५ कि.मी. गाडीने तुफान पाठलाग करून सिनेस्टाईलने तीन संशयितांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चोरीसाठी उपयुक्त वस्तूही सापडल्या. आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांनी वैतागलेल्या बाळापूर पोलिसांनी तीन संशयितांना पीकअप गाडीसह अटक केली आहे. मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास ५ कि.मी. गाडीने तुफान पाठलाग करून सिनेस्टाईलने तीन संशयितांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चोरीसाठी उपयुक्त वस्तूही सापडल्या. आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून हळद चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. तीन वेअर हाऊस व दोन शेतातील आखाड्यांवरून लाखो रूपये किमतीच्या हळदीची चोरी झाली. बाळापूर ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले. पण चोरांचा तपास लागत नव्हता. याचा शोध बाळापूर पोलीस घेत होते. पण यश मिळत नव्हते. २१ जून २०१८ रोजी रात्री १०.३० वा. च्या सुमारास पोनि व्यंकटेश केंद्रे यांना अर्धापूर भागात चोरट्यांच्या पाठीमागे काहीजण लागले. पण ते चारचाकी लोडिंग वाहनात बसून पसार झाल्याची खबर गुप्त खबऱ्याने दिली. यावेळी चालक व पोकाँ भालेराव यांना घेवून वारंगा- बाळापूर रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना दाती ते कुर्तडीदरम्यान एक पीकअप गाडी तुफान वेगाने पोलीस वाहनाला ओव्हरटेक करून गेली. वाहनाचा नंबर व वर्णन मिळते जुळते दिसले. मग तुफान वेगात त्या वाहनाचा पाठलाग करून बाळापूरच्या बसस्थानकाजवळ त्या वाहनाच्या पुढे पोलीस वाहन आडवे लावून थांबविले. किर्र काळोखात क्षणाचाही विलंब न करता ठाणेदार व एका कर्मचाºयाने तिघांना ठाण्यात आणले. तिघांची वेगवेगळी विचारपूस केली असता तिघांनीही वेगवेगळी उत्तरे दिली. पोलिसाचा संशय त्यामुळे अधिक बळावला. त्यांच्याजवळून लोखंडी हुक, आकडे, शटर उचकवण्यासाठीच्या बनवून घेतलेल्या टॉम्या, सबल असे साहित्य जप्त केले. सुनीलसिंग उर्फ सोनुसिंग गुलाबसिंग बावरी (२०), पंजाबसिंग धरमसिंग टाक (३२) दोघेही रा. इंदिरानगर, कळमनुरी व पिकअप गाडीचा चालक-मालक चंदनलाल सुरजलाल जैस्वाल (५६) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून पिकअप गाडी एम.एच. २९- एम. १३८१ व संशयिताचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांच्याकडे पुढील तपास आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती फौजदार तानाजी चेरले यांनी दिली.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcrimeगुन्हे