शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चुंचा ग्रा.पं.त गैरव्यवहाराचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:04 IST

कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील ग्रामपंचायतीला आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या वापरात अनियमितता व प्रशासकीय नियम धाब्यावर बसून त्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर ठपका ठेवत कारवाई करण्याची सूचना या चौकशी अहवालात देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील ग्रामपंचायतीला आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या वापरात अनियमितता व प्रशासकीय नियम धाब्यावर बसून त्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर ठपका ठेवत कारवाई करण्याची सूचना या चौकशी अहवालात देण्यात आली आहे.कळमनुरी तालुक्यातील चुंचा ग्रामपंचायत वादाच्या भोवºयात सापडली आहे. येथे आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. २७ लाख ५७ हजार ४३७ रुपये हा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला होता. परंतु त्याचा विनियोग नियमाप्रमाणे करण्यात आला नसल्याचे चौकशी अहवालात सिद्ध झाले आहे. २०१५-१६ यावर्षी ५ लाख ९८ हजार ०२५ रक्कमेमधून तत्कालीन ग्रामसेवक यू.टी. आडे व सरपंच सुरेखा सुरेश इंगोले यांनी हातपंप दुरूस्ती भरणा १० हजार रुपये एवढाच खर्च केल्याचे दिसते. उर्वरित ५ लाख ८८ हजार रुपयांचे पाणीपुरवठ्याचे काम व फर्निचर खरेदी केल्याचे कोणतेही अभिलेखे पहावयास मिळाले नाहीत. तसेच सदरील कामाचे अंदाजपत्रकही पहावयास मिळाले नाही. झालेल्या कामाचे अंदाजपत्रक, कामाचे मूल्यांकन, अंतिमीकरण, ग्रामपंचायत ठराव यांचे अभिलेखे चौकशीसाठी मिळाले नाहीत. त्यामुळे सदर रक्कमेची अनियमितता केल्याचे आढळून आले. २०१६-१७ मध्ये अग्रीममधून शाळेच्या कंपाऊंड वॉलचे गेट बसविणे, तांड्यामध्ये पाण्याच्या टाकी बांधकाम, दलित वस्तीमध्ये पाणीपुरवठा व आॅपरेटर मानधन इत्यादी कामे प्रस्तावित केल्याचे दिसले, परंतु एलईडी लाईट बसविण्याबाबत ग्रामपंचायत व प्रोसिडींगला ठराव न घेता परस्पर प्रस्तावित केल्याचे सिद्ध झाले. एलईडी लाईट बसविण्यासाठी निविदा न काढणे, ठराव न घेणे, ई टेडरींग न घेणे अशी प्रक्रिया अंमलात आणलेली नाही.सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक बी.पी. कुटे यांनी एलईडी बसविण्याचे शर्ती अटीचे पालन न करता लाईट बसविण्यासाठी पौर्णिमा इलेक्ट्रिकल्स यांना ३ लाख ९९ हजार ३८९ रुपयांचा परस्पर धनादेश देऊन कर्तव्यात कसूर केला आहे. तर २०१६-१७ मध्ये १४ व्या वित्त आयोगातून ९ लाख १८ हजार २४७ रुपयांचे कामे केलेली असून कामाचे अंदाजपत्रक, मूल्यांकन, अंतिमीकरण झालेले आहे. परंतु ग्रामपंचायतीची प्रशासकीय मान्यता, कृती आराखडा ठराव व जमाखर्चास मान्यता घेतलेली दिसून येत नाही. ही बाब कर्तव्यात कसूर करणारी आहे. असा ठपका ग्रामसेवक ए.आर. मुंढे यांच्यावर करण्यात आलेला आहे. कळमनुरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा चौकशी अधिकारी यांनी या चौकशीत ग्रामसेवक ए.आर. मुंढे, ग्रामसेवक बी.पी. कुटे, ग्रामसेवक यू.टी. आडे व सरपंच सुरेखा सुरेश इंगोले यांनी पदाचा दुरूपयोग करून हा आर्थिक अनियमिततेचा कट रचून तो यशस्वी केला असल्याचा ठपका कळमनुरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा चौकशी अधिकारी यांनी ठेवला आहे.यात ते दोषी आढळले असल्याने ३ ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करण्याबाबत सुचित केले आहे.दरम्यान, चुंचा येथील ग्रामसेवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकारही चर्चेत आला आहे. वारंगा फाटा येथे हा ग्रामसेवक आढळला होता. ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाºयांनी संबंधितास खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतMONEYपैसा