शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चिमुकलीची प्रकृती धोक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:00 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे सालगडी म्हणून असलेल्या संतोष बिलोरकर यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे सालगडी म्हणून असलेल्या संतोष बिलोरकर यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली होती.द्रौपदी असे चिमुकलीचे नाव आहे. संतोष बिलोरकर हे मूळचे बामणी येथील असून, ते कामानिमित्त आपल्या कुटुंबियासोबत लाख येथे सालगडी म्हणून राहत आहेत. ते शेतातच वास्तव्यास असल्याने त्यांची पत्नी शेतमालकाच्या घरात राहण्याची व्यवस्था करत होती. दरम्यान, तिने आपली चिमुकली बाहेर बाजेवर ठेवून घराची साफसफाई करीत होती. तिथे आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने द्रौपदीवर हल्ला करीत तिचे लचके तोडत असल्याने द्रौपदी जोराने किंचाळली. तर बाजूलाच असलेली तिच्या बहिणीने आईला जोरजोरात आवाज देऊन ‘ आई, आपल्या बाईला कुत्रा ओढून नेत आहे’, असे रडत सांगत होती. दरम्यान, आई धावत आली आणि तिने कुत्र्याच्या तावडून चिमुकलीला सोडविले. दरम्यान चिमुकलीच्या डोळ्याचे, हाताचे व मांडीचे लचके तोडले होते. चिमुकलीला तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी हलविले. चिमुकलीवर डॉ.नितीन अग्रवाल, डॉ. विनोद बीडकर यांनी उपचार केले. तर तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. एक ते दोन दिवसांत उपचार पूर्ण करून तिला सुटी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य