शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महावितरणपुढे ३ कोटी वसुलीचे आव्हानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:42 IST

महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेअंतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघुदाब वीज ग्राहकांकडे सप्टेंबर २०१७ अखेर असलेल्या ४९ कोटी ५१ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीपोटी नांदेड परिमंडळातील २४ हजार ३१२ वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला आहे. जिल्ह्यातील १ लाख १० हजार ३८८ वीजग्राहकांकडे ५ कोटी ७७ लाख थकबाकी आहे. त्यापैकी २ कोटी ४ लाख वसूल केले. उर्वरित रक्कम वसुलीसाठी महावितरणपुढे आव्हानच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेअंतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघुदाब वीज ग्राहकांकडे सप्टेंबर २०१७ अखेर असलेल्या ४९ कोटी ५१ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीपोटी नांदेड परिमंडळातील २४ हजार ३१२ वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला आहे. जिल्ह्यातील १ लाख १० हजार ३८८ वीजग्राहकांकडे ५ कोटी ७७ लाख थकबाकी आहे. त्यापैकी २ कोटी ४ लाख वसूल केले. उर्वरित रक्कम वसुलीसाठी महावितरणपुढे आव्हानच आहे.थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांनी वसुलीसाठी कंबर कसली आहे. त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळत आहे. मोहीम सुरू करण्यात आली तेव्हापासून मागील १७ दिवसांत वीज ग्राहकांनी प्रतिसाद देत १२ कोटी ७३ लाखांचा वीज बिल भरणा केला. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ४७ हजार ९३५ वीज ग्राहकांनी ६ कोटी ८१ लाख, परभणी जिल्ह्यातील ६ हजार २१७ वीज ग्राहकांनी ३ कोटी ८८ लाख तर हिंगोली जिल्ह्यातील १० हजार ५८८ वीज ग्राहकांनी २ कोटी ४ लाख रूपये भरले आहेत. महावितरणची शून्य थकबाकी मोहीम जोरात सुरू असून कुठल्याही परिस्थितीत थकबाकी शून्य झालीच पाहिजे या ध्येयाने महावितरणमधील वरिष्ठ अधिकाºयांसह कर्मचारी परिश्रम घेत आहेत. ज्या वीजग्राहकांनी अद्याप थकीत रक्कम भरली नाही, त्यांनी तत्काळ महावितरणकडे बिलभरणा करण्याचे आवाहन केले.वीजग्राहकांना आपल्या सोयीनुसार वीजबिल भरता यावे याकरिता वीजबिल भरणा केंद्रासोबतच विविध पयार्यांची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. इंटरनेट बँकींग, मोबाईल अ‍ॅप, पेटीएम, वेबसाईटव्दारे विजबिल भरले जात आहे. विशेष म्हणजे महावितरणची सर्व वीजबील भरणा केंद्र आता आॅनलाईन केल्याने कुठल्याही ग्राहकाला कुठेही बिल भरणा केंद्रावर वीज बिल भरता येणार आहे. महावितरणच्या सेवेबाबत अद्ययावत राहण्याकरिता वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.