शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

२८ रोजी सभापती निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:27 IST

आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता फोडाफोडी व इतर बाबींच्या भीतीपोटी नवनिर्वाचित संचालकांना सहलीवर पाठविले आहे. तर पदाधिकारी निवडीच्या सभेची तारीख निश्चित होत नसल्याने खर्चाच्या भीतीने पॅनलप्रमुखांच्या पोटात भीतीचा गोळा उठत होता. मात्र २८ जानेवारीला पदाधिकारी निवडीची सभा ठेवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता फोडाफोडी व इतर बाबींच्या भीतीपोटी नवनिर्वाचित संचालकांना सहलीवर पाठविले आहे. तर पदाधिकारी निवडीच्या सभेची तारीख निश्चित होत नसल्याने खर्चाच्या भीतीने पॅनलप्रमुखांच्या पोटात भीतीचा गोळा उठत होता. मात्र २८ जानेवारीला पदाधिकारी निवडीची सभा ठेवली आहे.आखाडा बाळापूर बाजार समितीची निवडणूक ही सहकार खात्याच्या नव्या नियमानुसार झाली. मतदारसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचताना सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या नाकीनऊ आले होते. यात अनेकांना संचालक होणेही महागात पडले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या १0 तर भाजप-सेना युतीच्या ८ जागा आल्या आहेत. मात्र त्यात दोन्हींकडूनही दावे-प्रतिदावे केले जात असल्याने खबरदारी म्हणून सदस्य सहलीवर नेण्याची तयारी करण्यात आली. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवर गेले आहेत. यात काँग्रेसचेच बहुतांश सदस्य असून राष्ट्रवादीला बहुतांश ठिकाणी अपयशाचेच धनी व्हावे लागल्याने युतीला चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. मात्र आता फोडाफोडीत काही सदस्य गळाला लागल्यास हाती आलेली संधी जाण्याच्या भीतीने आघाडीने सदस्य बाहेर पाठविले. तर दुसरीकडे युतीचे सदस्य मोकळेच असल्याने चुकून त्यांच्याच सदस्यांना आघाडीने गळाला लावू नये म्हणजे मिळविले.शुक्रवारी आखाडा बाळापूर बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीची तारीख जिल्हा प्रशासनाने काढली आहे. २८ जानेवारी रोजी ही सभा घेण्यात येणार आहे. यात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर हे बाळापूर बाजार समितीत पीठासीन अधिकारी म्हणून ही प्रक्रिया पार पाडणार आहेत. तहसीलदार व सहा निबंधक त्यांना साह्य करतील.निवडणुकीची तारीख निघाल्याने पॅनलप्रमुखांना हायसे वाटत असेल. मात्र तरीही तब्बल दहा दिवस हे संचालक सांभाळावे लागणार आहेत. यामध्ये किती आर्थिक झळ बसेल, हा वेगळा प्रश्न. त्यातही फोडाफोडी करणाऱ्यांना तर त्याहीपेक्षा मोठा भुर्दंड बसू शकतो.एकंदर पदाधिकारी निवडीसाठी दोन्ही पॅनलप्रमुख जोरात असले तरीही नव्या नेतृत्वाचा उदय यातून होणार की, जुन्या अनुभवी चेहºयाच्या स्वाधीन बाजार समिती केली जाईल, हा प्रश्नच आहे. एक-दोन वगळता सर्वच संचालक नव्या फळतील आहेत. तसेही दत्ता बोंढारे व दत्ता माने ही दोनच नावे निवडणुकीत चालली. राजकारणात काहीही होवू शकते. त्यामुळे अनुभवी चेहराही समोर येवू शकतो.बाळापूर बाजार समिती सभापती-उपसभापती निवडीबाबत माजी खा.शिवाजी माने यांना विचारले असता ते म्हणाले, शेवटच्या क्षणी आम्ही अपेक्षित संचालकसंख्या जोडू. युतीकडेच बाजार समिती येईल, याची पूर्णपणे तयारी केलेली आहे. निवडीच्या दिवशी ते लक्षात येईल. तर विद्यमान आ.संतोष टारफे म्हणाले, आघाडीचे सदस्य सुरक्षितस्थळी आहेत. फोडाफोडीची आम्हाला काही भीती नाही. उलट विरोधकांनीच त्यांच्याकडे असलेल्यांकडे लक्ष नाही दिले तर तेही संचालक आमच्याकडे आले तर नवल नाही.आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीने कळमनुरी व औंढा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळले. काहींनी तर निवडणुकीनंतरही वादांची लड वाजविणे सुरू केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड