शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कनेरगावात ट्रॅक्टर पोळा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:12 IST

जिल्हाभरात मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात ग्रामीण भागातून दिवसभर बैलजोड्या येत होत्या. यावेळी घरासमोर सर्जा-राजाची जोडी उभी राहताच मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जात होती. हिंगोली शहरातील वंजारवाडा येथील पोळा मारोती मंदिरास प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. नागरिक मोठ्या उत्साहाने पोळा सण पाहण्यासाठी एकत्रित जमले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हाभरात मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात ग्रामीण भागातून दिवसभर बैलजोड्या येत होत्या. यावेळी घरासमोर सर्जा-राजाची जोडी उभी राहताच मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जात होती. हिंगोली शहरातील वंजारवाडा येथील पोळा मारोती मंदिरास प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. नागरिक मोठ्या उत्साहाने पोळा सण पाहण्यासाठी एकत्रित जमले होते.कनेरगाव नाका : हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी शेतकऱ्यांनी बैल पोळ्यासोबत ट्रॅक्टर पोळा भरविला. ट्रॅक्टर पोळ्याचे हे १९ वे वर्ष आहे. शेतकºयांच्या जीवनात बैलाला फार महत्त्व आहे. शेतीची सर्वच कामे पूर्वी बैलांकडून कामे केली जात असत. परंतु आधुनिक युगात हळूहळू बैलाची संख्या कमी झाल्याने शेतकरी सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करू लागला आहे. शेतातील नांगरणी, पेरणी, मळणी व इतर कामे ट्रॅक्टरवर करता येत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर पोळा भरवावा, ही कल्पना २००० साली गावातील व्यापारी तथा शेतकरी स्व. शरद जोशी यांच्यासोबत डॉ. संतोष खंडुजी गावंडे तसेच स्व. आत्माराम बर्वे यांनी मांडली. नंतर ती ग्रामस्थांसमोर मांडली. सर्व ग्रामस्थांनी बैलांप्रमाणे ट्रॅक्टर पोळा भरविण्याची प्रथा सुरू केली. बैल व ट्रॅक्टर पोळ्याच्या दिवशी तोरणाखाली उभे करून त्यांची पूजा केली जाते. या पोळ्याच्या पूजेचे मानकरी गावातील विठ्ठल मारोती गावंडे, गणेश रामेश्वर गावंडे, जगदीश प्रल्हाद गावंडे, गणेश विठ्ठल गावंडे, शिवाजी कुंडलिक गावंडे व बालाजी जयभारत गावंडे, रवि जोशी आहेत. हे मानकरी बैलांची व ट्रॅक्टरची पुजा करतात. मानकºयांच्या घरी जावून त्यांना वाजत गाजत पोळ्याच्या ठिकाणी आणले जाते व त्यांच्या हस्ते पुजा केली जाते. नंतर पोळा फुटून ट्रॅक्टर व बैलांची गावातून मिरवणूक काढली जाते. यासाठी तंटामुक्त अध्यक्ष भारत बर्वे, डॉ. संतोष गावंडे, राम पाटील, रामचंद्र गावंडे, किसन गावंडे, बाळू पाटील, गणपत गावंडे, बालाजी गलंडे, शिरीष जोशी, बालाजी गावंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक