दरवर्षी सेक्रेड हार्ट चर्चमध्ये नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. येशूंच्या जन्माचा देखावा, ख्रिसमस ट्रीची आकर्षक सजावट हे या ठिकाणचे वैशिष्ट्ये असते. या ठिकाणी या दिवशी ख्रिश्चन बांधवांसह इतरही लोक या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. येथील देखावे व सजावट पाहण्यासाठी गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोनामुळे या गर्दीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळाले. ख्रिश्चन बाधवांनी मात्र हजेरी लावली. या ठिकाणी चर्चचे मुख्य धर्मगुरू फादर रॉकी लोपेस व विश्वस्त यांनी क्रिसमस हा सण २५ तारखेला साजरा केला. यामध्ये केरलसिंगिंग आणि पवित्र मिसा बलिदान प्रार्थना यांचा समावेश होता. तर सकाळी येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित नाटिका तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांनाही ख्रिश्चन बाधवांनी हजेरी लावली होती.
सेक्रेड हार्ट चर्चमध्ये नाताळ उत्हासात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST