लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : फूस लावून मुलीस पळवून नेणाºया दोघांना हिंगोली ग्रामीण पोलिसांनी ९ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. मुलीस फूस लावून दोघांनी पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने हिंगोली ग्रामीण ठाण्यात दिली. दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिंगोली शहरातील रिसाला बाजार येथील आरोपी आॅटोचालक आसिफ व अन्य एकाने आनंदनगर भागातील युवतीस ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास फूस लावून पळवून नेले.याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. तपास पोउपनि सुप्रिया केंद्रे करीत आहेत.
युवतीस पळविणारे दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:59 IST