शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सलग तीन दिवसात तीन तरुणांच्या आत्महत्यांमुळे बोराळा गाव सुन्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 14:03 IST

suicides of three youths in three days in a row in Hingoli District सलग तीन दिवस घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी ग्रामस्थ पार हादरून गेले.

ठळक मुद्देग्रामस्थ हादरले, शब्दही फुटेनात !आर्थिक विवंचना सोसवली नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल

कौठा (जि.हिंगोली)  : रविवारी आत्महत्या केलेला राजू रोज मजुरीवर जायचा. घरचे दोन एकर शेत. यंदाही सोयाबीन पेरले. परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. वडील बाबूराव व आई सीताबाई यांच्यासह रोज मजुरी करून राजू शेती सांभाळायचा. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. मात्र नापिकी व गरिबी पिच्छा सोडत नसल्याची खंत त्याला सतावत होती. त्यामुळे त्याने मृत्यूला कवटाळले.  सलग तीन दिवस तीन आत्महत्यांच्या घटनांमुळे छोटेसे बोराळा गाव सुन्न झाले आहे.

गावात सध्या याच एका विषयावर चर्चा सुरु आहे. याबाबत बोराळा गावचे सरपंच भीमराव जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, सोयाबीन हातचे गेले. कर्जमाफीचा लाभ नाही. यात अनेक शेतकरी नाराज आहेत. मात्र त्यामुळे परिस्थितीसमोर हार मानून कसे चालणार? आर्थिक मदत करणे शक्य नसले तरीही लोकांमध्ये नवी उमेद जागविण्यासाठी जनजागृती करणार आहोत. यासाठी जिल्हा प्रशासनाने काही मदत केली तर अधिक बरे होईल, असे ते म्हणाले. 

ग्रामस्थ हादरले, शब्दही फुटेनात !सलग तीन दिवस घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी ग्रामस्थ पार हादरून गेले. ४00 ते ५00 उंबऱ्यांचे हे गाव यंदा सुरुवातीपासून अतिवृष्टी, दुबार, तिबार पेरणीने हैराण आहे. प्रभाकर जाधव, राजू गंगातिरे यांना आर्थिक विवंचना सोसवली नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सुरुवातीला तर या एकाही प्रकरणाबाबत कुणी बोलायला तयार नव्हते.

प्रभाकरलाही नापिकीचा फटकाप्रभाकर जाधव हाही पंचफुला व घनश्याम यांचा एकुलता एक मुलगा. पत्नी कविता व ६ आणि ४ वर्षांच्या दोन चिमुकल्यांना उघड्यावर टाकून त्याने जीवन संपविले. त्याच्या नावे ५४ आर. तर कुटुंबाकडे एकूण दोन हेक्टर जमीन आहे. शेतातील सोयाबीन व कापूस अतिपावसामुळे हातचे गेल्याने प्रभाकर चिंताग्रस्त होता.

टॅग्स :Suicideआत्महत्याHingoliहिंगोलीFarmerशेतकरी