शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावरील पुस्तक म्हणजे मानवी गुलामगिरीची उकलपेरणी - भ. मा. परसवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

संजय टाकळगव्हाणकर लिखित कोरोना - गुलामगिरीचे नवे पर्व : टाळेबंदी-पर्यावरण रक्षणाचा नवा मार्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त हिंगोली येथील ...

संजय टाकळगव्हाणकर लिखित कोरोना - गुलामगिरीचे नवे पर्व : टाळेबंदी-पर्यावरण रक्षणाचा नवा मार्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त हिंगोली येथील राष्ट्रवादी भवनात २४ जानेवारी रोजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, ज्येष्ठ कवी विलास वैद्य, सैनिक फेडरेशनचे राज्य कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, माजी जि. प. सदस्य संजय दराडे, डॉ. एम. आर. क्यातमवार, कुंडलिक निर्मले, ॲड. सुकेशिनी ढवळे आणि भूषण स्वामी आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्गाचे भय व लादण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे जगभरात सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करून जागतिक सत्ता व अर्थकेंद्रे मूठभरांच्या हातात एकवटली जात असल्याने हे जागतिक स्थित्यंतर अत्यंत साध्या व सोप्या भाषेत लेखक संजय टाकळगव्हाणकर यांनी प्रस्तुत पुस्तकात मांडले असल्याचे भ. मा. परसवाळे यांनी सांगितले.

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले की, या पुस्तकात जागतिकीकरणाच्या रेट्यात देशासमोर अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, राजकीय नेतृत्व हे हतबल झाल्याचे दिसून येते. ही बाब पुस्तकातील काही भाग वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. या पुस्तकावर देशस्तरावर विचारमंथन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सोळंके तर आभारप्रदर्शन मुरलीधर जायभाये यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुरलीधर गोडबोले, अशोक पवार, वामन टाकळगव्हाणकर, गुणाजी नलगे, गंगाप्रसाद भिसे, गजानन पायघन, विठ्ठल कानोडे आदींनी परिश्रम घेतले.