हिंगोली बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ८ एप्रिल २०२० रोजी संपली होती. राज्य सरकारने २४ ऑगस्ट २०२० रोजी बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक केली होती. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध बाजार समितीचे सभापती हरिश्चंद्र शिंदे व उपसभापती शंकरराव पाटील व इतर काही संचालकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. राज्यातील इतरही बाजार समित्यांची मुदत संपलेली असताना त्या बाजार समित्यांना मुदतवाढ दिली. त्याच धर्तीवर हिंगोली बाजार समितीला मुदतवाढ मिळावी, अशा आशयाची याचिका दाखल केली होती.
औरंगाबाद खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने १९ मार्च रोजी निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयावरून बुधवारी बाजार समितीवरील नियुक्त प्रशासक जितेंद्र भालेराव यांनी संचालक मंडळाकडे पदभार सोपवला.
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह हरिश्चंद्र शिंदे, शंकरराव पाटील, दत्तराव जाधव, रावजी वडकुते, उत्तमर वाबळे, प्रभाकर शेकळे, प्रशांत सोनी, श्रीराम पाटील, हमीद प्यारेवाले, पप्पू चव्हाण, बाजार समितीचे सचिव नारायण पाटील, सहायक सचिव रवींद्र हेलचल आदी उपस्थित होते.