शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याविना रूग्णांचे बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:33 IST

जिल्हा रुग्णालयात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे बेहाल होत आहेत. पिण्याचे पाणी रूग्णालयाबाहेरून आणावे लागत आहे. त्यामुळे गरिब रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. तसेच विविध वार्डमधील स्वच्छतागृहांतही पाणी नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून इतर आजार बळावण्याची शक्यता नाकारत येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रुग्णालयात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे बेहाल होत आहेत. पिण्याचे पाणी रूग्णालयाबाहेरून आणावे लागत आहे. त्यामुळे गरिब रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. तसेच विविध वार्डमधील स्वच्छतागृहांतही पाणी नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून इतर आजार बळावण्याची शक्यता नाकारत येत नाही.दिवसेंदिवस जिल्हा रूग्णालयातील समस्या वाढतच चालल्या आहेत. कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारीही रूग्णालयातील समस्या व सुविधेकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांसह नातेवाईकांची गैरसोय होत आहे. सध्या जिल्हा रूग्णालयात प्रचंड पाण्याचा तुटवडा आहे. परंतु नेहमीचच ही समस्या असल्याने याचे आता गांभीर्य राहिले नाही, अशी अवस्था झाली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या मध्यभागी एकच वॉटरकूलरची व्यवस्था आहे. रूगालयाच्या वरच्या नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या वार्डांतही पाण्याची बोंब आहे. विशेष म्हणजे रुगालयाच्या बाहेर पाच रूपयाला फिल्टर झालेले पाणी मिळते. त्यामुळे विकतचे पाणी घेतल्याशिवाय पर्याय नाही. या प्रकारामुळे मात्र रूग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत.जिल्हा रूग्णालय : एकाच वॉटर कूलरवर भिस्तजिल्हा रूग्णालयात रूग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी केवळ एकच वॉटर कूलर बसविण्यात आले आहे. संपूर्ण रूग्णालयाची भिस्त एकाच वॉटरकुलर आहे. जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी दिवसाकाठी २०० च्या जवळपास रूग्ण येतात. त्यामुळे पाण्याविना रूग्ण व नातेवाईकांना भटकंतील करावी लागत असल्याचे चित्र आहे. मागील अनेक वर्षांपासून रूग्णालयातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नाही. शिवाय रूग्णांच्या नातेवाईकांनी अनेकदा पाण्याच्या समस्येबाबत वरिष्ठांकडे मागणीही केली होती.जिल्हा रूग्णलयातील सीटीस्कॅन कक्षासमोरील वॉटरकुलरच्या नळाला तोटीच नसल्याचे बुधवारी दिसून आले. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होताना दिसून आला. याकडे मात्र कोणीही लक्ष देत नव्हते, हे विशेष.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य