शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बालकामगार वाढू लागले

By admin | Updated: June 12, 2014 00:21 IST

हिंगोली : बालकामगारांचे प्रमाण कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून केले जाणारे प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे अपुरी पडू लागले आहेत.

हिंगोली : बालकामगारांचे प्रमाण कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून केले जाणारे प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे अपुरी पडू लागले आहेत. परिणामी जिल्ह्यात बालकामगारांची संख्या वाढत आहे. बालकेही राष्ट्राची संपत्ती असून, त्यांच्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. या बालकांना सुदृढ बनविणे, ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असली तरी त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी हिंगोली शहरातील विविध भागात फेरफटका मारला असता शहरातील हॉटेल, पानटपरी, बांधकामाचे काम, वाहन दुरूस्तीचे ठिकाण आदी ठिकाणी बालकामगार काम करीत असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात १ मे २०१२ रोजी आखाडा बाळापूर येथे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बालकामगारांना सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले होते. तसेच या बालकांना पुन्हा कामावर पाठविले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची कडक तंबी देण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनीही सरकारी कामगार अधिकाऱ्यांना मदत केली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हिंगोली सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने एकाही ठिकाणी कारवाई केलेली नाही. हिंगोली येथील कार्यालयासाठी गेल्या चार वर्षांपासून कायमस्वरूपी सरकारी कामगार अधिकारी उपलब्ध नाही. कधी नांदेड तर कधी परभणीच्या अधिकाऱ्यांकडे या पदाचा पदभार दिला जातो. सध्या परभणी येथील अधिकारी कराड यांच्याकडे हिंगोलीचा पदभार आहे. कराड यांनी दोन महिन्यांपूर्वी नांदेडच्या अधिकाऱ्यांकडून पदभार घेतला. त्यांनीही या कालावधीत एकदाही कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती यासंदर्भात बालकांकडून काम करून घेणाऱ्यांवर कडक कारवाई करते; परंतु जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी गेल्या तीन वर्षांत एकदाही अशी कारवाई केली नाही की, एखाद्या ठिकाणाला भेट दिली नाही. परिणामी बालकामगारांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे या बालकांचे पुनर्वसन होत नाही, त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत नाहीत. (जिल्हा प्रतिनिधी)