शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत आघाडीपेक्षा युतीलाच बंडखोरीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:58 IST

जिल्ह्यातील तीन मतदारसंघात तीन पक्षाचे आमदार आहेत. यंदा येथे तिरंगी लढती अटळ दिसत असून आघाडी व युतीला वंचित आघाडीचेही आव्हान राहणार आहे.

- विजय पाटील हिंगोली : जिल्ह्यातील तीन मतदारसंघात तीन पक्षाचे आमदार आहेत. यंदा येथे तिरंगी लढती अटळ दिसत असून आघाडी व युतीला वंचित आघाडीचेही आव्हान राहणार आहे. विद्यमान आमदारांपैकी कुणाचेच तिकीट कापले जाण्याची शक्यता नाही.लोकसभा निवडणुकीत तिन्ही मतदारसंघामध्ये सेनेच्या हेमंत पाटील यांना मोठे मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे युतीतील इच्छुकांना या वेळी कोणत्याही परिस्थितीत संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. काहींची तर बंडखोरीचीही तयारी आहे. त्यामुळे आघाडीतील अनेक इच्छुकांनी काढता पाय घेतला आहे.मागच्या विधानसभेला आघाडी व युतीही झाली नव्हती. त्यामुळे प्रमुख सर्वच पक्ष रिंगणात होते. आता आघाडी व युती दोन्हीही होण्याची शक्यता वाढल्याने व काहींनी इतर पक्षात प्रवेश केल्याने त्यांची अडचण होणार आहे. बहुतेकांच्या हाती बंडाचा झेंडा दिसण्याची चिन्हे आहेत.हिंगोलीविधानसभा भाजपकडे आहे. येथे याच पक्षाचे तान्हाजी मुटकुळे सध्या आमदार आहेत. मात्र येथे सेनेच्या रुपाली पाटील गोरेगावकर, रामेश्वर शिंदे हेही इच्छुक आहेत. काँग्रेसचे माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर तयारी करीत आहेत. राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर दावा केला असून विधान परिषदेचे आ. रामराव वडकुते यांची तयारी सुरू आहे. त्यामुळे येथे युती व आघाडीतही बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.कळमनुरी मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे हे सध्या आमदार आहेत. येथे त्यांच्याशिवाय कोणी इच्छुक नाही. मात्र माजी खा. राजीव सातव यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. त्यांनी आधीच नकार दिलेला असतानाही या चर्चा होत आहेत. येथे शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संतोष बांगर तयारी करीत आहेत.मात्र मागच्या वेळचे पराभूत सेनेचे माजी आ. गजानन घुगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खा. शिवाजी माने यांचीही लढण्याची तयारी आहे. ते दोघेही आता भाजपमध्ये असल्याने युती झाल्यास बंडखोरी अटळ आहे.वसमतमध्ये शिवसेनेचे विद्यमान आ. जयप्रकाश मुंदडा पुन्हा इच्छूक असले तरी भाजपचे शिवाजी जाधव यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. ती नाही मिळाली तरीही जाधव मैदानात राहतीलच.राष्ट्रवादीकडून जयप्रकाश दांडेगावकर यांचीही तयारी सुरूआहे. राजू पाटील नवघरेही चर्चेत आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यात चांगले मतदान वंचित आघाडीला मिळाले आहे. त्यामुळे त्यांचेही उमेदवार राहणार आहेत.>गत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारकाँग्रेस-१, राष्ट्रवादी-१, शिवसेना-१सर्वांत मोठा विजय : हिंगोली-तान्हाजी मुटकुळे (भाजप)- ५६४४६ (पराभव : भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेस)सर्वांत कमी मताधिक्याने पराभव: वसमत- जयप्रकाश दांडेगावकर - ५५५६ (विजयी : जयप्रकाश मुंदडा- शिवसेना)

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाHingoliहिंगोली