सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेवर गोविंद भिका राठोड हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ९ फेब्रुवारी रोजी गोविंद राठोड हे शाळेच्या वर्गखोलीत होते. यावेळी बरडा येथील केशव शिवाजी सानप हा तेथे आला व वर्गखोलीच्या दरवाजातून पाहत होता. यावेळी काय पाहिजे, काय पाहत आहेस असे म्हणताच केशव सानप याने मुख्याध्यापक राठोड यांचा मोबाइल जमिनीवर फेकून देत दगडाने फोडून टाकला. तसेच गळा दाबण्याचा प्रयत्न करत थापडबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद मुख्याध्यापक गोविंद राठोड यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी केशव शिवाजी सानप याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक माकने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक माकने करीत आहेत.
बरडा पिंपरी शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST