शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली शहरासह परिसराला अवकाळीचा तडाखा; वादळवाऱ्यांत झाडे उन्मळून पडली, वीज वाहिन्याही तुटल्या

By रमेश वाबळे | Updated: May 28, 2023 19:03 IST

शहरासह परिसराला २८ मे रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अवकाळीचा तडाखा बसला.

हिंगोली : शहरासह परिसराला २८ मे रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अवकाळीचा तडाखा बसला. वादळवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, वीज वाहिन्याही तुटल्या आहेत. तर काही ठिकाणी विद्युत खांब वाकले आहेत. सुमारे अर्धा तासाच्या या अवकाळीने नागरिकांची तारांबळ उडाली होती. यंदा अवकाळी संकट जिल्हावासीयांची पाठ सोडत नसून, एप्रिल आणि मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत अधूनमधून वादळवाऱ्यासह पाऊस झाला. या अवकाळीत हळदीसह फळबागा आडव्या झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी २८ मे रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अचानक वादळवाऱ्यासह पाऊस कोसळला. वादळवाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने हिंगोली शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तसेच अनेक वृक्षांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. तर अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्याही तुटल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हिंगोलीसह सेनगाव, पुसेगाव, जांभरूण रोडगे, नर्सी नामदेव, डिग्रस कऱ्हाळे भागातही वादळवाऱ्यासह पाऊस झाला.

वाहनांचे नुकसान...हिंगोली शहरातील जुनी पोलिस वसाहत भागात उभ्या कारवर झाड कोसळले. यासह जुनी नगरपालिका, जवाहर रोड, शासकीय विश्रामगृह भागातही वृक्षांच्या फांद्या तुटून दुचाकीसह काही वाहनांवर पडल्याने नुकसान झाले.

वादळवाऱ्यात मंडप उडाला...हिंगोली शहरातील भारतीय विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा २८ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा सुरू असताना अचानक वादळवारे आणि पाऊस आला. वादळवाऱ्याने या ठिकाणचा मंडप उडाला. तसेच याच ठिकाणी उभ्या दुचाकीवर एक झाड कोसळले.

वीज पुरवठा खंडित...वादळवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, जुनी नगर पालिका, इंदिरा गांधीचौक, जवाहर रोड, तसेच इतर विविध भागात वीज वाहिन्या तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते.

बसस्थानकातील पीओपीसह पंखा कोसळला...शहरातील बसस्थानकात वादळवाऱ्यामुळे पीओपीसह एक पंखा कोसळला. सुदैवाने प्रवाशाला इजा झाली नाही. तर आगार कार्यालयातील एका कक्षात काच फुटल्याने एका कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत झाली. पावसाचे पाणी मात्र बसस्थानकात आल्याने या ठिकाणी प्रवाशांना बसणेही अवघड झाले होते. तसेच या ठिकाणी छताला गळती लागल्याने दुकानांमध्ये पाणी शिरल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस