शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त वीजमीटर मिळणार बदलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:22 IST

वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, असा नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, असा नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.हिंगोली जिल्ह्यात महावितरणचे जवळपास १ लाख १० हजार वीज ग्राहक आहेत. मात्र अनेकांच्या वीजमीटरमध्ये बिघाड आहेत, म्हणजेच ते नादुरूस्त आहेत. शिवाय नादुरूस्त मीटर बदलून द्यावेत याबाबत अनेक वीजग्राहकांनी महावितरणकडे अर्जही केली आहेत. सध्या नादुरूस्त वीजमीटची तपासणी महाविरणच्या पथकाकडून केली जात आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात मोहीम राबविली जात आहे. शिवाय नादुरूस्त मीटरची यादीही अधिकाºयांनी मागविली आहे. त्या अनुषंगाने आता विना मोबदला नादुरूस्त मीटर बदलून मिळतील. विशेष म्हणजे मीटर रीडिंग मोबाईल अ‍ॅपद्वारे असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता आलेली आहे. या कामांमध्ये गतीमानता आली असली तरी मीटर रीडिंग एजन्सीजकडून अद्यापही सदोष मीटर रीडिंग घेण्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास सहन करावा लागत असून नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय महावितरणचे सुद्धा आर्थिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी व बिलिंगमध्ये अचूकता यावी यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक उपाययोजना कराव्यात अशा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी निर्णय घेतला असून संबंधितांना तशा सूचनाही दिल्या आहेत.महावितरण : वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचनासिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याच जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्याचे निर्देश आहेत. विशेष म्हणजे नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाही याप्रमाणे कार्यवाहीकरून, यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे मीटर तात्काळ बदलून द्यावेत. अशा वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाभरात मोहिम राबविली जाणार आहे.जिल्ह्यात तालुकानिहाय नादुरूस्त वीजमीटर बदलून दिले जात आहेत. महावितरणच्या अधिकाºयांच्या सूचनेनुसार मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी म्हणाले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण