शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार वितरणाचे नियोजन बारगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:03 IST

आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. यावर्षीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली. आता त्यातही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आदर्श शिक्षक पुस्कार सोहळा कधी पार पडणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. यावर्षीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली. आता त्यातही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आदर्श शिक्षक पुस्कार सोहळा कधी पार पडणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.आदर्श पिढी घडविणाऱ्या, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाºया शिक्षकांचा शिक्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी सन्मान करून त्यांना आदर्श पुरस्कार वितरित केला जातो. परंतु शिक्षण विभागातर्फे याबाबत वेळेवर नियोजन केले जात नाही. त्यामुळे प्रस्ताव दाखल करण्यास व संचालकांकडे पाठविण्यास विलंब होतो. त्यामुळे शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकांना मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. केवळ नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा वेळेत पार पडत नाही, अशा प्रतिक्रियाही अनेक शिक्षकांनी दिल्या. गतवर्षी एकूण ६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावर्षी एकूण १६ जणांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. परंतु आता निवड समितीची बैठक कधी पार पडेल आणि कधी विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे सदर प्रस्ताव पाठविले जातील हा प्रश्नच आहे. परंतु नियोजनाअभावी मात्र यंदाही पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर गेला आहे. १७ सप्टेंबरनंतर आता पुढची तारीख कोणती काढण्यात येणार? असा प्रश्न शिक्षकांतून उपस्थित केला जात आहे.हिंगोली : गतवर्षीही नियोजनाचा अभावतालुका स्तरावरून संबधित गटशिक्षणाधिकाºयांनी जिल्हा शिक्षण कार्यालयात आतापर्यंत १६ शिक्षकांचे प्रस्ताव दाखल केले आहेत. निवड समितीमार्फत सदर प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार होते. परंतु अद्याप समितीची बैठकच पार पडली नाही.त्यामुळे आता पुढील कार्यक्रम रेंगाळला आहे. पुरस्कार वितरणाबाबत दरवर्षी नियोजन नसते. त्यात बैठकही लवकर होत नाही. परिणामी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडतो. यावर्षीही गतवर्षीचे चित्र आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले १७ सप्टेंबर रोजी होणार कार्यक्रम पुढे ढकल्यात आला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक