हिंगोली ३.८० मिमी, कळमनुरी ९.१०, वसमत ४.९०, औंढा २.७०, तर सेनगाव १.९० मिमी अशी तालुकानिहाय पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगले पर्जन्यमान झाले आहे. जून ते सप्टेंबर या कालावाधीतील पर्जन्यमानाच्या ९६.८९ टक्के पर्जन्य झाले आहे. या काळातील पर्जन्याच्या कळमनुरीत १०५ टक्के, तर औंढ्यात ११८ टक्के पाऊस झाला. जून ते ऑक्टोबर या कालावधीतील पर्जन्याच्या ८९.२५ टक्के पाऊस झाला आहे.
यंदा वारंवार अतिवृष्टी होत असून, यामुळे जीवितहानीचे प्रकारही यंदा वाढल्याचे दिसून येत आहे. दरवेळी असा मोठा पाऊस झाला की, एक ते दोन बळी जात असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीच्या मोठ्या पावसात चार जणांचा बळी गेला होता, तर कालच्या पावसातही तीन जणांचा बळी गेला आहे. ठरावीक भागातच होत असलेल्या या पावसामुळे ढगफुटीसदृश स्थिती निर्माण होत आहे. अचानकच नदी व नाल्यांना पूर येत आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज न आल्याने जीवितहानीचे प्रकार घडत आहेत.