शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जवळा पांचाळ येथे वानरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:48 IST

कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे सगळीकडेच वानरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतातील कामे सोडून वानराच्या मागेच फिरावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे सगळीकडेच वानरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतातील कामे सोडून वानराच्या मागेच फिरावे लागत आहे. शेतामध्ये असलेली पिके कापूस, सोयाबीन, केळी, भाजीपाला व इतर सर्व पिकांची नासधूस करीत आहेत. पिकांना आलेल्या सोयाबीनच शेंगा, कापसाचे घाटरे खाऊन धिंगाणा करीत आहेत.परिसरात अशा अनेक टोळ्या आहेत. एका टोळीत पन्नास ते साठ वानरे आहेत. दररोज सकाळी शेतात राहत आहेत.गावातले सर्वच शेतकरी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या वानरांच्या मागेच फिरावे लागत आहे. गावामध्ये अनेकांच्या घरामध्ये घुसून घरातील भाकरी नेत आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरावरील पत्र्यांवर उड्या मारीत असल्याने अनेकांच्या घरावरील लाकडे मोडत आहेत. संबंधित वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.वानरे पळवताहेत ताटातल्या भाकऱ्यानांदापूर : परिसरात जवळपास शंभर वानरांचा कळप असून या वानरांनी गावात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गावाजवळील शेतातील पिकांसह घराच्या गच्चीवर वाळत घातलेले धान्य वानरे फस्त करत आहेत. ग्रामस्थ हुसकावण्यास गेल्यावर त्यांच्या अंगावर धावून येत आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या मागे लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ घरात जेवण असताना घरात घुसून ताटातून भाकरी उचलून नेत आहेत. या वानरांकडे वन विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागMonkeyमाकड