शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याचा ऐन मीटिंगमध्ये मृत्यू; वरिष्ठांनी ‘व्हीसी’मध्ये धमकी दिल्याचा नातेवाइकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 16:11 IST

हिंगोलीच्या महावितरण कार्यालयातील धक्कादायक प्रकार

हिंगोली : येथील महावितरण कार्यालयात सचिन दत्तात्रय कोळपे (वय ३८, रा. नांदेड) या सहायक अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १) दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली. ‘व्हीसी’ दरम्यान मुख्य अभियंत्याने कामासंदर्भातील आढावा घेताना धमकी दिल्यामुळे ताण आल्याने कोळपे यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला.

महावितरणच्या नांदेड विभागांतर्गत नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी नांदेड येथील मुख्य अभियंत्याकडून व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात येत होती. यादरम्यान तीनही जिल्ह्यातील महावितरणच्या अभियंत्यांना सूचना दिल्या जात होत्या. यावेळी हिंगोली महावितरण कार्यालयात ग्रामीण विभाग-१चे सहायक अभियंता सचिन कोळपे अचानक खुर्चीवरून खाली कोसळले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डाॅक्टरांनी सांगितले. त्यानंतर कोळपे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. कोळपे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा अंदाज डाॅक्टरांनी व्यक्त केला.

‘...तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही’सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मयत कोळपे यांचे नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. कोळपे यांचा मृत्यू कामाचा ताण आणि वरिष्ठांच्या धमक्यांमुळे झाल्याचा आरोप करीत जोपर्यंत नांदेड विभागाचे मुख्य अभियंता, हिंगोलीचे अधीक्षक अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यूmahavitaranमहावितरण