शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज करण्यासाठी उद्याची ‘डेडलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:53 IST

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ साठी २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. आॅनलाईन अर्ज करण्याची संधी शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पालकांनी अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ साठी २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. आॅनलाईन अर्ज करण्याची संधी शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पालकांनी अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले.यापूर्वी जे पालक विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करू शकले नाहीत, त्यांना आता संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांचे आॅनलाईन अर्ज भरताना शासनाने दिलेल्या अटींचे पालन करावे, तसेच रहिवासी पुराव्यानुसार गुगल मॅपमध्ये आॅनलाईन लोकेशन योग्य प्रकारे मॅपिंग करून घ्यावे. विशेष म्हणजे अर्जात भरलेल्या माहितीची पालकांनी खात्री करावी. प्रवेश निश्चित करताना शाळेत सर्व मूळ प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, सर्व शिक्षाचे प्रशांत भगत यांनी केले आहे.जिल्ह्यातील ५९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली आहे. २५ टक्के ६९२ आरक्षित जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला तेव्हापासून ११३१ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची आॅनलाईन पद्धतीने लॉटरी काढून प्रथम फेरी १ किमी अंतरावरील शाळांसाठी झाली. यात एकूण २४५ विद्यार्थ्यांची आॅनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली. त्यापैकी १५० विद्यार्थ्यांचे पात्र शाळेत प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.दुर्बल घटकांतील बालकांनाही मोफत शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागेत प्रवेश मिळावा यासाठी शासनाकडून अर्ज प्रक्रियेची तारीख वाढविण्यात आली. आहे. ४ जून आॅनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.प्रवेश निश्चित झालेल्या खासगी शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही, अशा पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी पालकांतून केली जात आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र