शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: June 25, 2014 00:41 IST

हिंगोली : दवाखाना बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणण्याची मागणी करीत शारिरिक व मानसिक छळ करून डॉक्टर विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी

हिंगोली : दवाखाना बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणण्याची मागणी करीत शारिरिक व मानसिक छळ करून डॉक्टर विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जेलची हवा खात असलेल्या तीन आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. ही घटना कळमनुरी शहरात १५ मे रोजी घडली असून पतीसह सासू-सासरा, दीर हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.औंढा तालुक्यातील लाख येथील अ.भा.मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे यांची मुलगी डॉ. सोनाली हिचा विवाह कळमनुरी येथील डॉ. मुकेश लक्ष्मणराव श्ािंदे याच्याशी दोन वर्षापुर्वी झाला होता. लग्नानंतर दवाखाना बांधण्यासाठी सासरच्या मंडळींकडून १० लाखाची मागणी करून सतत डॉ. सोनाली हिचा छळ करण्यात येऊ लागला. सासरच्या या जाचाला कंटाळून डॉ. सोनाली शिंदे हिने कळमनुरीतील विद्या नगरात राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी त्र्यंबक चंपतराव लोंढे (रा.लाख ह.मु. हिंगोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुकेश शिंदे (पती), लक्ष्मणराव गणपतराव शिंदे (सासरा), हेमलता लक्ष्मणराव शिंदे (सासू), मयूर उर्फ महेश लक्ष्मणराव शिंदे (दीर, सर्व रा.विद्यानगर, कळमनुरी) यांच्याविरूध्द कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. सुरूवातीला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान, आरोपी लक्ष्मणराव शिंदे , हेमलता शिंदे , मयूर शिंदे यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी २० जून रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी होऊन न्यायालयाने हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचा शेरा देत तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानदेव टेकनूर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)