या कार्यशाळेस निवासी जिल्हाधिकारी सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. यू. सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजीत संघई, डॉ. आकाश कासलीवाल, जिल्हा रुग्णालयाचे डी. एस. चौधरी, डॉ. गाेपाल कदम, आनंद साळवे आदींची उपस्थिती हाेती. या कार्यशाळेंतर्गत सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशाने सर्व कार्यालयीन प्रमुखांची उपस्थिती हाेती. कार्यशाळेस एकूण ५५ प्रशिक्षणार्थी होते.
तसेच या कार्यशाळेत कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, राज्य प्रकल्प अधिकारी डॉ. आकाश कासलीवाल, जिल्हा रुग्णालयाचे आनंद साळवे, डॉ. फैसल सलीम खान, विभागीय व्यवस्थापक अभिजीत संघई, परिचारिका रोशनी गौरकर, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. फरिदा गोहर यांचा गाैरव करण्यात आला.