शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

हिंगोलीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:42 AM

स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे.

हिंगोली : स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे. आगामी काळात दहा कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.हिंगोली नगरपालिका क्षेत्रात मागील दोन ते अडीच वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी धडपड केली जात आहे.पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी सगळ्यांनीच यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे यापूर्वीही नगरपालिकेने तीन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. आता पुन्हा गुणांकनानुसार रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. गतवर्षी ३९ व्या क्रमांकावर असलेली हिंगोली पालिका यावेळी पश्चिम झोनमध्ये १00२ शहरांशी स्पर्धा करीत २९ व्या क्रमांकावर आली आहे.स्वच्छतेत ठेवलेल्या सातत्यामुळे तीनदा केंद्रीय पथकाने तपासणी केल्यानंतरही हे यश मिळाले आहे. शहरातील विविध भागात जवळपास ३५ पेक्षा जास्त सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत. याशिवाय शहरात नियमितपणे घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रकार आता बंदच झाल्यात जमा आहेत.तर सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या ठेवून त्यांचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिवाय डम्पिंग ग्राऊंड व अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन पद्धतीही राबविण्यात येत आहे. त्यामुळे गुणांकन सुधारले आहे. हे अभियान सुरु करताना अनेक यंत्रणांकडून सीएसआरच्या माध्यमातून गोरगरिबांना कचरा कुंड्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे स्वच्छतेत सातत्य राखण्यात यश मिळाले आहे. भविष्यात शहराला शासनाकडून १0 कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याचीही शक्यता आहे.

मेहनतीचे फळहिंगोली शहराचा चेहरा बदलत आहे. त्यासाठी सभागृहातील सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. त्याचे फळ म्हणून पालिका स्वच्छतेत अग्रेसर राहिल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले.सातत्य राखलेहिंगोली शहरातील स्वच्छतेसाठी विविध उपक्रम आखले. जनतेच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न झाला. तर सातत्य राखता आल्याने हे यश मिळाल्याचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण म्हणाले.सामूहिक यशहिंगोलीकरांनी या उपक्रमास चांगली साथ दिली. पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी सांघिक काम केले. त्यामुळे मराठवाड्यात प्रथम येण्याचा मान मिळाला, असे मुख्याधिकारी रामदास पाटील म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान