शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

चार दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:40 IST

जिल्ह्यातील बहुतांश भागात एक ते दोन दिवस झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळणारच असून कर्जमाफीची रक्कमही खात्यावर चार दिवसांत पडणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील बहुतांश भागात एक ते दोन दिवस झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळणारच असून कर्जमाफीची रक्कमही खात्यावर चार दिवसांत पडणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हा कृषी महोत्सव व कयाधू बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सेंद्रिय शेतीमाल व खरेदीदार विक्रेता संमेलनात पालकमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा निसर्गासमोर खरोखरच हतबल झाला आहे. त्याला यावर्षीच्याही हंगामात सोडलेले नाही. मात्र सध्याचे सरकार त्या शेतकºयाला वाºयावर न सोडता, त्याला कशा पद्धतीने अडचणीतून बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्नशील आहे. तर शेतकºयांनी केवळ शेतीवरच लक्ष केंद्रित न करता शेतीला जोडव्यवसाय केल्यास निश्चितच उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच शेतकºयांनी मोठ्या कष्टाने पिकविलेले धान्य कोणत्याही दलालामार्फत न विक्री करता त्याला थेट बाजारपेठेत विक्री करता यावे म्हणूनच या कृषी प्रदर्शनीचे आयोजन केल्याचे सांगितले.कांबळे म्हणाले, ज्या शेतकºयांचे गारपिटीने नुकसान झाले आहे. त्या शेतकºयांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळणार म्हणजे मिळणारच ! असे कडक आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्याचे कांबळे यांनी सांगितले. शिवाय, कर्जमाफीची रक्कम बहुतांश शेतकºयांच्या खात्यात जमा झाली आहे. ज्यांची झाली नसेल त्यांच्याही खात्यात येत्या दोन ते तीन दिवसांत जमा होणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या धिराने शेतीची कामे करत-करत पाण्याचेही नियोजन करावे. जास्त पाणी दिल्यानेही जमिनीचा पोत बदलण्याची चिन्हे असतात. अनेक जिल्ह्यांत तशा पद्धतीचीही उदहारणेही असल्याचे ते म्हणाले. तर बचत गटातील महिलांना अल्पदरात कर्ज उपलब्ध करुन देणारच आहोत. तसेच शून्य टक्के व्याजदारानेच कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कांबळे म्हणाले. तसेच मागासवर्गीय बचत गटासाठी १०० टक्के अनुदानावर ट्रॅक्टरही उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यामुळे निश्चतच तंत्राज्ञानाचा वापर करुन शेतीतील उत्पन्न काढण्यास मदत होईल.यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, आ.डॉ. संतोष टारफे, प्रभारी जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जि. प. सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड यांनीही शेतकºयांना मार्गदर्शन केले. सूत्रंसचालन विजय ठाकरे, प्रास्ताविक एम. डी. जाधव तर आभार एम. डी. तीर्थकर यांनी मानले. कार्यक्रमास मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.माहिती : रोज मिळणार नव- नवीन ज्ञानकृषी प्रदर्शनीमध्ये जवळपास ४० ते ५० बचत गट दाखल झा आहेत. विशेष म्हणजे पाच दिवस चालणाºया या प्रदर्शनीमध्ये विविध खाद्य पदार्थासह वस्तू ही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याच बरोबर शेतीला जोड व्यवसाय करता यावा म्हणून विविध प्रकारचे व्यवसाय करता यावे म्हणूनतज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन ठेवण्यात येणार आहे. शिवाय, तांत्रीक पद्धतीने शेती कशी करता येईल यासाठी लागणाºया यंत्र सामुग्रीचेही नव- नवीन पाच दिवस मार्गदर्शन केले जाणार असल्याचे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.कृषि प्रदर्शनीनिमित्त शासकीय विश्रामगृह येथून काढलेल्या पालखीला स्वत: पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी खांदा देऊन दिंडी सोबत प्रदर्शनीपर्यंत चालत आले. तर दिंंडीमध्ये उत्कृष्ट लेझीम खेळणाºया व स्वागत गित गाणाºया अंध विद्यार्थ्यांचेती त्यांनी तोंड भरुन कौतूकजिल्ह्यात ७८ गावांचे नुकसान४पालमंत्री कांबळे यांनी हिंगोली तालुक्यातील सिरसम, लिंबाळा, डिगी, आडगाव या भागातील शेतीची नुकसानीची पाहणी करुन १५ शेतकºयांशी सवांद साधला. जिल्ह्यात एकूण ७८ गावांचे नुकसान झाले आहे. जिरायती ८ हजार ८, तर बागायती ४ हजार ४४७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे होताच येत्या आठ ते दहा दिवसांत शेतकºयांना भरपाई मिळेल, असे ते म्हणाले.पालिकेच्या कामाची चौकशी करणार४सन २००६- १५ या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वच कामांची चौकशी करण्यात येणार आहे. या कामांमध्ये काही अनियमितता आहे काय? याची काटेकोरपणे तपासणी होईल, असेही पालकमंत्री कांबळे म्हणाले. तर एनटीसी भागाच्या चौकशीचेही त्यांनी सुतोवाच केले. जिल्ह्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ८३ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाले आहेत.