कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शिवारातून दत्ता मारोती कराळे (रा. गंगाखेड ह.मु. भाटेगाव शिवार) याच्याकडून १ हजार २० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १७ बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात पोहेकॉ भगवान वडकिले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. तसेच सेनगाव तालुक्यातील वझर येथेही गजानन विलास पवार (रा. वझर) याच्याकडून १ हजार २६० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १८ बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस नाईक शिवदर्शन खांडेकर यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सेनगाव तालुक्यातील नानसी येथे विजय यशवंत बानकर याच्याकडून १ हजार ४०० रुपये किमतीच्या २० बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस नाईक जीवन मस्के यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
जिल्ह्यात ठिकठिकाणी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST