शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर मातांसाठी वातानुकूलित कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:00 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर मातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. मात्र जागेअभावी रुग्णांची गैरसोय होत होती, ही बाब रुग्णालय प्रशानाने लक्षात घेऊन अतिजोखमीच्या गरोदर मातांसाठी स्वतंत्र वातानुकूलित कक्ष उभारला आहे. त्याचे उद्घाटन १८ मे रोजी शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. आता गरोदर मातांना रुग्णालयात उपचारासाठी ताटकळत बसण्याची वेळ तूर्तास टळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर मातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. मात्र जागेअभावी रुग्णांची गैरसोय होत होती, ही बाब रुग्णालय प्रशानाने लक्षात घेऊन अतिजोखमीच्या गरोदर मातांसाठी स्वतंत्र वातानुकूलित कक्ष उभारला आहे. त्याचे उद्घाटन १८ मे रोजी शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. आता गरोदर मातांना रुग्णालयात उपचारासाठी ताटकळत बसण्याची वेळ तूर्तास टळणार आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवसाकाठी ३० ते ३५ महिलांची प्रसूती होते, तर तपासणीसाठी गरोदर मातांचीही संख्या वाढली आहे. मात्र या ठिकाणी तपासणीस येणाऱ्या रुग्णांची गर्दी जास्त होत आहे. त्यामुळे गरोदर मातांना डॉक्टरांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. तर कित्येकदा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरही महिला प्रसूत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता या कक्षामुळे महिलांना अजिबात बाहेर बसण्याची वेळ नाही. यामध्ये जोखमीच्या व अतिजोखमीच्या गरोदर स्त्रियांसाठी प्रसूतीच्या वेळी रुग्णालयात दाखल केल्यास किंवा गरोदरपणात त्यांना काही गुंतागुंत झालेली असल्यास, त्यांच्यासाठी हा स्वतंत्र वॉर्ड बनविण्यात आला आहे. यालाच ‘आॅबस्ट्रिक हाय डिपेडन्स वॉर्ड’ असे नाव दिलेले आहे. ज्या गरोदर स्त्रियांना रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय वारंवार गर्भपात, उंचि कमी असणे, गरोदरपणात झटके येणे, हृदय आजार असेल, अशा गरोदर स्त्रियांची विशेष देखभाल या कक्षात केली जाणार आहे. जेणेकरुन मातामृत्यू, बाल मृत्यूला आळा बसण्यास मदत होईल. या ठिकाणी एकूण ८ पलंग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उद्घाटनप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. पोहरे, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. परदेसी, मेट्रन मीना मस्के, देशमुख, आर. के. जोशी, प्राचार्या गिरी, जया परदेशी, ज्योती पवार आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य