शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अतिक्रमण हटाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:40 IST

शहरात पुन्हा यावर्षी अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. हरण चौक, इंदिरा गांधी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. पुढील टप्प्यात रहदारीला त्रासदायक ठरणारी इतरही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरात पुन्हा यावर्षी अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. हरण चौक, इंदिरा गांधी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. पुढील टप्प्यात रहदारीला त्रासदायक ठरणारी इतरही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.हिंगोली शहरात दरवर्षीच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येते. मात्र काही दिवसांनी पुन्हा अतिक्रमणे ‘जैसे थे’ होत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनानेही वाहतुकीला त्रासदायक ठरणारी ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी दाखविली होती. त्याचबरोबर बांधकाम विभागाने अग्रसेन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घेण्यास सांगितले होते. ती पोलीस बंदोबस्तात काढून घेण्यात आली आहेत. त्याचवेळी शहरातही ही मोहीम राबविली जाणार असल्याचे संकेत मिळत होते. मात्र मध्यंतरी प्रशासनाची अडचण व सणाच्या पार्श्वभूमिवर त्याला मुदतवाढ दिली होती. आज सकाळपासूनच हरण चौक, इंदिरा गांधी चौक ते डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतची अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. अनेकांनी गतवर्षी तोडलेल्या छपऱ्या, टपºया, फूटपाथवरील ओटे, पायºया पुन्हा बनविल्याचे पहायला मिळाले. त्यावर पुन्हा एकदा जेसीबी चालविण्यात आला आहे. अतिक्रमणधारक वारंवार या बाबींवर खर्च करीत असले तरीही प्रशासनही तेवढीच सक्षमपणे कारवाई करीत आहे.ही मोहीम टप्प्या-टप्प्याने शहरातील इतर भागातही राबविली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे दुकानदारांनी स्वत: काढून घेण्याचे आवाहन मुख्याधिकाºयांनी केले. गांधी चौक, जवाहर रोड, भाजीमंडई यासह इतर भागातील अतिक्रमणेही हटविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या मोहिमेमुळे यापुढे तरी कोणी अतिक्रमण करण्यास धजावणार नाही, अशी आशा आहे.सध्या भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे अतिक्रमणे केलेल्या ठिकाणी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अनेकजण ही मोहीम अंतर्गत भागात राबविण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमण