शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांपासून हटवलेले अतिक्रमण ‘जैसे थे’; आता केली थेट जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 17:57 IST

या परिसरात उभारण्यात आलेल्या ओट्यांवरून भाजी, फळे विक्री करण्याऐवजी मुख्य चौकात ठाण मांडले जात असल्याने पालिकेकडून कारवाई केली जात आहे.

हिंगोली : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक भागातील अतिक्रमण हटविण्याचा खेळ मागील आठ दिवसांपासून सुरूच आहे. ‘आधी हटले अन् पुन्हा थाटले’ अशी परिस्थिती चौथ्याच दिवशी अनुभवायला मिळाली. आज पुन्हा सर्वांचेच अतिक्रमण हटविले; मात्र ही परिस्थिती किती दिवस कायम राहील? हा प्रश्नच आहे. 

हिंगोली नगरपालिका व पोलिसांच्यावतीने संयुक्तरित्या जुन्या नगरपालिका कार्यालयापासून या अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. त्यात खुराणा पेट्राेल पंप, जवाहर राेड, भाजी मंडई, इंदिरा गांधी पुतळा चौक, महात्मा गांधी पुतळा चौक, पार्किंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते अण्णा भाऊ साठे पुतळा चौक परिसर  या ठिकाणापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत अनेकांचे हातगाडे जप्त करण्यात आले आहेत. वारंवार सांगूनही हातगाडेधारकांकडून याच भागात गाडे लावले जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय या परिसरात उभारण्यात आलेल्या ओट्यांवरून भाजी, फळे विक्री करण्याऐवजी मुख्य चौकात ठाण मांडले जात असल्याने पालिकेकडून कारवाई केली जात आहे. मागील आठवड्यातच अशी कारवाई केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ झाले आहे. त्यामुळे आता थेट हातगाडे जप्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेचे बाळू बांगर म्हणाले की, यात जवळपास २५ ते ३० हातगाडे जप्त केले आहेत. ही माेहीम अजूनही सुरू आहे. या भागात पुन्हा अतिक्रमण करू नये, रस्ते मोकळे ठेवावेत, अशा सूचना दिल्या आहेत. त्या पाळल्या गेल्या नाही, तर पुन्हा कारवाई करण्यात येईल.

पीपल्प बँक रोडचे काय?पीपल्स बँकेकडून जि. प. शाळेकडे जाणारा रस्ता असो की, इंदिरा गांधी पुतळ्याकडे जाणारा रस्ता, या भागातही अतिक्रमणे वाढत आहेत. वाहतुकीचेही तीनतेरा वाजत आहेत. शिवाय या मार्गावर रस्त्यात हातगाडे, अवैध वाहतुकीची वाहने, अवैध गॅरेज, अवैध पार्किंगही आहे. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांना पायी चालणे अवघड बनत आहे. मोंढा भागातील रस्त्यांवरही अतिक्रमण होऊ लागले आहे. पालिकेच्या पथकाने ठराविक भागाऐवजी शहरभर कारवाई करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमण