शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का पुढे सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:46 IST

पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत.जिल्ह्यातील विविध राष्टÑीयीकृत बँकेत आजही पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी खेटे घेत आहेत. तर बºयाच बँकेतील शाखाधिकारी शेतकºयांचे साधे बोलणेही ऐकायला तयार नसल्याचे चित्र आहे. बहुतांश बँकेत दलालांमार्फत पीककर्ज वाटपाला तेवढा प्रतिसाद मिळाला. त्यातच पीक कर्ज वाटपाच्या कागदपत्र जुळवा - जुळवीत शेतकरी हैराण झाल्याचे पहायला मिळाले. यात मात्र काही केल्या एका फेरीत त्याचे काम होईल याची शाश्वतीच नाही. अनेकदा तर बँकेतील अधिकाºयांची प्रतीक्षा करीत शेतकरी रिकाम्या हाताने परतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता पीककर्ज वाटपाला पीकविम्याची मुदत संपताच अनेकांनी ब्रेक दिला असल्याचेही चित्र आहे. पीकविम्याचा लाभ सोबतच द्यावयाचा असल्याने ही कारणे सांगून काहींनी संचिका थोपवून धरल्या आहेत.हिंगोली जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेने १४ हजार ९८२ शेतकºयांना ३१.२0 कोटींचे कर्जवाटप केले. हे प्रमाण २३ टक्के आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी ७ हजार शेतकºयांना ६८.७९ कोटींचे कर्जवाटप केले. या बँकांनी ७२0 कोटींचे कर्जवाटप करावे, असे उद्दिष्ट दिले होते. ते फक्त ९.५६ टक्के पूर्ण केले. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४४३५ शेतकºयांना ३४ कोटी वाटले. हे प्रमाण ३३.0५ टक्के आहे.९५९ कोटींचा लक्षांक असताना बँकांनी केवळ १३४ कोटींचे पीककर्ज वाटले आहे.जिल्ह्यातील बँकाची पीककर्ज वाटपासाठी नकारघंटा आहे. त्यातच नवीन सभासदांना अद्यापपर्यंत ६९ कोटी ८६ लाख ५७ एवढे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७९ शेतकºयांना ११ कोटी ८५ लाख तर व्यापारी बँकाकडून ४ हजार ७०४ शेतकºयांना ४७ कोटी २ लाख तर ग्रामीण बँकेतून ३ हजार १६६ शेतकºयांना २२ कोटी ७१ लाख असे एकूण ७ हजार ९४९ शेतकºयांना ६९ कोटी ८६ लाख ५७ हजार रुपये वाटप करण्यात आलेले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी