शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी योग्यच केल्याचा प्रशासनाचा दावा

By admin | Updated: June 11, 2014 00:20 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी शासकीय नियमानुसारच केल्याचा दावा केला

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी शासकीय नियमानुसारच केल्याचा दावा केला असून, यासाठी २००३ मध्ये काढण्यात आलेल्या शासकीय निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु याच शासन निर्णयात कमी खर्चात सोडियम हायड्रोक्लोराईड किंवा ब्लिचिंग पावडरची खरेदी करावी, या दिलेल्या नियमाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने २०१३-१४ या वर्षाकरीता ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडर खरेदी करण्यासाठी ७ लाख रुपयांची तरतूद केली होती. या निधीमधून कमी किंमत असलेले ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याऐवजी महागडे सोडियम हायड्रोक्लोराईड खरेदी करण्यात आले. परिणामी जिल्हा परिषदेला नुकसान सहन करावे लागले. ही बाब माहिती अधिकारांतर्गत उघड झाली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला याबाबत खरेदीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषद पंचायत विभागाने अवाल तयार केला असून, त्यामध्ये २००३ मध्ये या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयाचा हवाला देण्यात आला आहे. त्यामध्ये नियमानुसारच सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच शासन निर्णयात कमी खर्चात सोडियम हायड्रोक्लोराईड किंवा ब्लिचिंग पावडर खरेदी करावी या टाकलेल्या अटीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कमी किमतीमध्ये ब्लिचिंग पावडर मिळत असेल तर जास्त पैसे देऊन सोडियम हायड्रोक्लोराईड खरेदी करण्यात अधिकाऱ्यांना काय स्वारस्य होते? याचा खुलासा होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जो खुलासा शासनाकडे सादर केला असून, तो अत्यंत तकलादू आहे. त्यामुळे या प्रकरणी आता वरिष्ठ पातळीवरून काय कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)