शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:06 IST

२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले.

ठळक मुद्देसकल मराठा समाज हिंगोलीत झाली बैठकभविष्यात लढा सुरूच ठेवण्याचा इशारा

हिंगोली : राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच राज्य सरकारकडे मराठा समाज मागास असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे, ईएसबीसी ही आरक्षणाची पद्धत नसून ही केवळ सवलत आहे. त्यामुळे भविष्यातसुद्धा मराठा समाजाचा लढा सुरूच राहील. तसेच २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभरात ५८ च्यावर मोर्चे काढण्यात आले आहेत. अखेर शासनाने मराठा समाजाची आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक परिस्थिती पाहण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सर्वे केला. यामध्ये मराठा समाज मागास असल्याचे स्पष्ट झाले असून तसा अहवालही आयोगाने राज्य सरकारकडे दिला आहे. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा तसेच ईएसबीसी हा आरक्षणाचा प्रवर्ग नसून ती केवळ एक सवलत आहे, अशीही चर्चा या बैठकीत झाली. तसेच राज्यभरात मराठा जनसंवाद यात्रा काढण्यात आली असून २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधान भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर, सर्कलनिहाय यासंदर्भात बैठकाही घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील मराठा समाजातील हजारो बांधवांनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीला जिल्हाभरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षण