शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन शाळांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:50 IST

जिल्ह्यात आरटीईमध्ये मोफत प्रवेश देणे क्रमप्राप्त असतानाही शुल्क आकारणाऱ्या दोन शाळा दोषी असल्याचा अहवाल शिक्षण समितीच्या बैठकीत सादर झाला आहे. या दोन्हीही शाळा हिंगोली तालुक्यातील असून त्यांच्यावर कारवाईची मागणी सदस्यांनी यावेळी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात आरटीईमध्ये मोफत प्रवेश देणे क्रमप्राप्त असतानाही शुल्क आकारणाऱ्या दोन शाळा दोषी असल्याचा अहवाल शिक्षण समितीच्या बैठकीत सादर झाला आहे. या दोन्हीही शाळा हिंगोली तालुक्यातील असून त्यांच्यावर कारवाईची मागणी सदस्यांनी यावेळी केली.शिक्षण सभापती भैय्या ऊर्फ संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. मागील अनेक सभा, समितीच्या बैठकीत या विषयावर लढा देणाºया विठ्ठल चौतमल यांना अखेर यातील अंतिम अहवाल पहायला मिळाला. यात हिंगोलीतील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल व कनेरगावची ज्ञानगंगा स्कूल या दोन शाळांमध्ये आरटीईत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याऐवजी शुल्क आकारल्याचे आढळून आले आहे. तर एका शाळेने तर यातील विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून परत मिळाल्यानंतरही ते संबंधितांना अदा केले नसल्याने त्याचीही चौकशी सुरू आहे.शिवाय विद्यानिकेतन यंदाही २0 विद्यार्थ्यांना आरटीईत प्रवेश देत नसल्याने दोनदा नोटीस दिल्याचे शिक्षणाधिकाºयांनी सांगितले. तर आता प्रशासक नेमण्यासाठी उपसंचालकांचे मार्गदर्शन मागविल्याचे सांगितले. उपसंचालकांनीच हे आदेश दिल्याने मार्गदर्शनाची गरज काय? असा सवाल चौतमल यांनी केला.तर शासनाच्या १४ अधिकाºयांनी आदेश काढून प्रतिनियुक्त्या रद्द करण्यास सांगितले असल्याने त्या तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.हंगामी वसतिगृहे : ३३0 विद्यार्थी बोगसऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ३७ हंगामी वसतिगृह जिल्ह्यात सुरू केले होते. त्यात २५३७ विद्यार्थ्यांची यादी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली होती. मात्र छाननीत २२0७ विद्यार्थीच पात्र ठरले होते. तर प्रस्तावित यादीत नसलेले ३३0 विद्यार्थी बायोमेट्रिकवर घेण्यात आल्याचा प्रकार आढळून आला आहे.हे विद्यार्थी बोगस असून त्याची रक्कम देवू नये, असे विठ्ठल चौतमल म्हणाले. तर १४३४ विद्यार्थ्यांनाच निधी देता येत असताना व म.रा.शि.प.ची मान्यता न घेता विद्यार्थी वाढले कसे? असा सवालही चौतमल यांनी केल्याने हे प्रकरण तापले होते.हंगामी वसतिगृहाच्या टिपणीतही दोष असल्याचे सांगून याबाबतची चौकशी उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांमार्फत करून अहवाल सादर करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा