शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

 वाशिम जिल्ह्यात अपघात; सेनगावचे दोन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:50 IST

तालुक्यातील आजेगाव व गुगूळपिंपरी येथील मावसभाऊ असलेले दोन युवक २५ मे रात्री १० च्या सुमारास वाशिम-रिसोड रस्त्यावर लाखाळा पाटी येथे झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील आजेगाव व गुगूळपिंपरी येथील मावसभाऊ असलेले दोन युवक २५ मे रात्री १० च्या सुमारास वाशिम-रिसोड रस्त्यावर लाखाळा पाटी येथे झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.तालुक्यातील आजेगाव येथील कल्पक दत्तराव डोळस (१९) हा त्यांच्या तालुक्यातील गुगूळपिंपरी येथील हर्षल धौत्रे (१७) याला सोबत घेवून एम.एच. ३८.८१४४ या मोटारसायकलने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास जात होता. लाखाळा पाटी येथे पवन मंगल कार्यालयासमोर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला उडविले. या अपघातात दोघांना अत्यंत गंभीर मारल्याने त्यांना वाशिम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु तोपर्यंत त्या दोघांचा मृत्यू झाला होता.कल्पक डोळस हा वाशिम येथील अग्निशमन दलात कार्यरत होता. मागील पंधरवड्यात त्याच्या बहिणीचा साखरपुडा त्याच्या पुढाकाराने झाला तर हर्षल याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. या दोन मावस भावाच्या अपघाती मृत्यूने तालुक्यातील आजेगाव, गुगूळपिंपरी या दोन्ही गावांत शोककळा पसरली आहे.दोघांच्या मृतदेहावर शनिवारी आप-आपल्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरातील मोठा जनसमुदाय अंत्यसंस्कारांस उपस्थित होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघात