शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
4
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
6
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
7
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
8
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
9
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
10
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
11
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
12
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
13
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
14
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
15
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
16
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
17
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
18
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
19
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
20
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."

पोस्टाच्या परीक्षेला निघालेल्या युवकाचा ट्रालीला धडकून अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST

कौठा : उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगवत पोस्ट विभागाच्या परीक्षा देण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांची नवी दुचाकी उभ्या ट्रक्टर ट्रालीला ...

कौठा : उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगवत पोस्ट विभागाच्या परीक्षा देण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांची नवी दुचाकी उभ्या ट्रक्टर ट्रालीला धडकून यातील एका तरुणांचा जागीच मृत्यू, तर एक जखमी झाल्याची घटना वसमत तालुक्यातील कौठा पाटीवर २३ जानेवारी राेजी सकाळी ४ वाजेच्या दरम्यान घडली. घटनास्थळी आलेल्या मयताच्या आई व नातेवाईक यांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात अश्रू आले होते.

डिग्रस कऱ्हाळे ता.हिंगोली येथील शुभम गोविंद पाईकराव व आणखी एक जण कुऱ्हे (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे नांदेड येथे होणाऱ्या भारतीय डाक विभाग पोस्टाच्या परीक्षा देण्यासाठी भल्या पहाटे हिंगोली-नांदेड मार्गे नांदेडकडे जात होते. वसमत तालुक्यातील कौठा पाटीवर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्राली पंक्चर झाल्याने ट्राली उभी होती. २३ जानेवारी रोजी सकाळी ४ ते ४:३०च्या दरम्यान हिंगोलीकडून येणाऱ्या या दोघांना उभ्या ट्रालीचा अंदाज न आल्याने पाठीमागून धडक दिली. यात शुभम पाईकराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोबतच्याला गंभीर इजा झाल्याने त्याला घटनास्थळी असलेल्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविले आहे.

अपघाताची माहिती डिग्रस कऱ्हाळे येथे कळताच शुभमची आई, वडील, भाऊ व इतर नातेवाईक आले, तेव्हा मृतदेह उचलण्यात येत होता, ते पाहून नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. आईचा आक्रोश पाहून घटनास्थळी जमलेल्या लोकांनाही अश्रू येत होते. अपघातस्थळी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि विलास चवळी यांच्यासह नरवडे, चव्हाण आदींनी भेट देऊन मदतकार्य केले.

फाेटाे २३ नं.एचएनएलपी व ०१