शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; ब्रेक निकामी झाल्याने घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 15:35 IST

Governor Bhagat Singh Koshyari in Hingoli :नरसी नामदेव येथे मंदिराच्या पायरीचे दर्शन घेवून राज्यपाल पुढे औंढा नागनाथ येथील नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरातकडे रवाना होणार आहेत.

हिंगोली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  (Governor Bhagat Singh Koshyari) यांचा ताफा हिंगोली येथून नर्सी नामदेव येथे पोहचला. याचवेळी त्यांच्या ताफ्यातील अग्निशामक विभागाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने ही गाडी समोरच्या दोन गाड्यांवर धडकली. त्यामुळे या दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये राज्यपाल किंवा त्यांच्या इतर वाहनांना काही नुकसान न झाल्याने अनर्थ टळला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता हिंगोली येथे हजेरी लावून जिल्ह्यातील सिंचनासह इतर मुद्यांचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर त्यांनी काही जणांची निवेदनेही स्वीकारली. त्यानंतर ते हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेवकडे रवाना झाले. नर्सी नामदेव येथे राज्यपाल कोश्यारी यांचा ताफा पोहोचताच अग्निशामक विभागाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले. यामुळे हे वाहन पुढील गाड्यांवर धडकले. यात दोन गाड्यांचे नुकसान झाले. यापासून राज्यपाल कोश्यारी यांचे वाहन दूर असल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या ठिकाणी मंदिराच्या पायरीचे दर्शन घेवून राज्यपाल पुढे औंढा नागनाथ येथील नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिराच्या पायरीच्या दर्शन घेऊन परभणीकडे रवाना होणार आहेत.

हिंगोलीतील आदिवासी प्रकल्पाच्या कामांचे राज्यपालांनी केले कौतुक

सिंचनाच्या प्रश्नावर सरकारला सूचना देवूहिंगोली येथे पत्रकारांशी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, राज्यपाल म्हणून मला मागासलेल्या, आदिवासीबहुल भागाचा आढावा घेणे, सिंचन, पिण्याचे पाणी, शिक्षण आदी प्रश्नांवर जाण करून घेत त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार मी या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलो आहे. ही सर्व माहिती घेतली तर राज्य व केंद्र सरकारशी बोलता येते. त्यावर निर्णय घेता येतात. या भागात काही अपूर्ण सिंचन योजना आहेत. मावेजा कमी मिळत असल्याने शेतकरी जमिनी देत नाहीत. शासन आता चारपट रक्कम मावेजा म्हणून देत आहे. पूर्वी कमी असायचा. त्यावर शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. अन्यथा सक्तीने भूसंपादन केले तरच हे विकास प्रकल्प होणार आहेत. यावर शासनाला निर्णय घ्यावा लागेल.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी