शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वारंगा फाटा येथे पुन्हा ३० जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2024 15:52 IST

सदर ट्रक बैल घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती.

हिंगोली: चार दिवसाखालीच २२ बैल कत्तलीसाठी घेऊन जाणारा ट्रक पोलिस व गोरक्षकांनी पकडल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा ३० बैल घेऊन जाणारा ट्रक गोरक्षक व पोलिसांनी कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे पकडला.  

१८ फेब्रुवारी रोजी गोरक्षक व पोलिसांनी वारंगा फाटा येथे नागपूरहून २२ बैलांना ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असताना एक ट्रक व तिघांना ताब्यात घेतले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा नागपूर येथूनच निजामाबाद येथे कत्तलीसाठी ३० बैलांना घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच ३१ सीबी ७९८७) गोरक्षक व पोलिसांनी वारंगा फाटा येथे पकडला.

सदर ट्रक बैल घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कनेरगाव नाका येथून सदरील ट्रकचा पाठलाग केला. ट्रक येत असल्याची माहिती पोलिसांनाही सदर गोरक्षकांनी दिली होती. ट्रकचा पाठलाग केला जात असल्याचे समजताच ट्रक चालकाने भरधाव वेगाने ट्रक पळून साळवा-जरोडा दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर टोल तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर वारंगा फाटा येथे त्या ट्रकचे टायर रनिंगमध्ये असतानाच गोरक्षकांनी पंक्चर करून ट्रक थांबविला.

गोरक्षकांनी तिघांना दिला चोप...

ट्रक पकडणाऱ्या गोरक्षकांनी ट्रकमधील विकास सेक्रीट डिसोजा (वय ३५, रा. नागपूर), शंकर निळकंठ कावडकर (वय ‌३२, रा. बिलगाव नागपूर), चालक मोहम्मद इर्शाद अन्सारी मोहम्मद आयुब अन्सारी (वय ३३, रा. यशोधरानगर नागपूर) या तिघा जणांना चोप दिला. या ठिकाणी उपस्थित असलेले पोलिस शिपाई प्रभाकर भोंग व होमगार्ड तसलीम प्यारेवाले यांनी त्यांच्या तावडीतून त्या तिघांची सुटका करून त्यांना बाळापूरच्या शासकीय दवाखान्यामध्ये दाखल केले. यावेळी ट्रकमधील बैलांची देखील सुखरूप सुटका करून त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गत चार दिवसांमध्ये वारंगा फाटा येथून कत्तलीसाठी जात असलेले ट्रक पकडल्याची घटना दुसऱ्यांदा घडली.

टॅग्स :Hingoliहिंगोली