जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ५८२ बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण करण्यासाठी १ हजार १७६ बुथची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी लसीकरण केंद्रावर घेऊन जाताना माता दिसत होत्या. यावेळी बसस्थानक, रेल्वेस्थानक, यासह वीटभट्टी, झोपडपट्टी आदी भागातही कर्मचारी लसीकरणासाठी पोहोचले होते. जिल्ह्यात सरासरी ९५ टक्के बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यात हिंगोली शहरातील ८२ बुथवर ९ हजार ४४६ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. दरम्यान, ग्रामीण भागातही लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ५८२ बालकांसाठी १ लाख ८३ हजार ८२० पोलिओ डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. यासाठी ८३३ आरोग्यसेवक, २४ पर्यवेक्षक, ८० मोबाईल पथक, ७५ ट्रांझिट पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलिओ लसीकरण मोहिमेत वंचित राहिलेल्या बालकांसाठी ग्रामीण भागात पाच दिवस, तर शहरी भागात ३ दिवस घरोघरी जाऊन बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे.
जिल्हाभरात ९५ टक्के पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST