शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९१ वाळूघाटांचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:11 IST

गतवर्षी वाळूघाट लिलावातून अवघा ७ लाखांचा महसूल मिळाला होता. तर वाळू चोरीच्या ५२ प्रकरणांत ८२ लाखांचा दंडच वसूल झाला होता. यंदा एप्रिलमध्ये गेलेल्या दोन घाटांमुळे आधीच ४0 लाखांचा महसूल मिळालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गतवर्षी वाळूघाट लिलावातून अवघा ७ लाखांचा महसूल मिळाला होता. तर वाळू चोरीच्या ५२ प्रकरणांत ८२ लाखांचा दंडच वसूल झाला होता. यंदा एप्रिलमध्ये गेलेल्या दोन घाटांमुळे आधीच ४0 लाखांचा महसूल मिळालेला आहे. आता नव्याने ९१ वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी वाळूघाट लिलावात कंत्राटदारांनी भागच न घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मार्चपूर्वी केवळ कसबे धावंडा हा एकच घाट गेला होता. त्यानंतर पुन्हा लिलावाची प्रक्रिया झाली. मात्र दर कमी होण्याची वाट पाहणाऱ्या कंत्राटदारांनी पाठ फिरविली होती. नंतर लिलाव तर झाला मात्र न्यायालय आदेशामुळे पुन्हा त्यावर पाणी फेरले गेले होते. एप्रिलमध्ये दोन घाट ३८ लाखांच्या लिलावात गेले.आता खनिकर्म, महसूल व भूजल सर्वेक्षण विभागाकडून वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणासाठी ९१ वाळूघाट प्रस्तावित केले आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात आल्यामध्ये जमा आहे. लवकरच त्याचा अहवाल विभागीय आयुक्तालयाकडे जाणार आहे. त्यानंतर या सर्व घाटांचे खानकाम व पर्यावरणीय आराखडे तयार करावे लागणार आहेत. त्यानंतर पर्यावरण मान्यता मिळाल्यास या घाटांचा लिलाव करणे शक्य होणार आहे. यंदा ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पावसाळ्यानंतर लागलीच वाळूघाट उपलब्ध होतील, यासाठी नियोजन करण्याचा प्रयत्न होत आहे.पात्र किती ठरणार?दरवर्षी ७0 ते ७५ पेक्षा जास्त वाळूघाटांचे सर्वेक्षण करण्यात येते. मात्र नंतर काही ठिकाणी नदी प्रवाहित असल्याने किंवा बॅरेजेसचा जलसाठा असल्याने ते आधीच या यादीतून बाद होतात. काही ठिकाणी पाणीच न वाहिल्याने वाळू आली नाही,त्यामुळे मोठी अडचण होते. परिणामी हे घाट बाद होतात. काही भागातील ठरावीक घाटच दरवर्षी लिलावासाठी उपलब्ध होतात. मुळात याच भागात वाळू निघते. त्यामुळे कंत्राटदारांचीही याच घाटांना पसंती असते. त्यामुळे यंदा ९१ पैकी किती घाट लिलावाच्या प्रक्रियेपर्यंत यादीत राहतील, हा यक्षप्रश्न आहे. तूर्ततरी बांधकाम क्षेत्रातील लोकांना वाळूघाट लिलावाची अपेक्षा आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली