शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकांचा ८0 टक्के पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:21 IST

: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शिक्षा अभियानकडून मोफत पाठ्यपुस्तक योजना २०१८-१९ अंतर्गत वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र औरंगाबाद यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्याला ७९.९७ टक्के मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. १५ जून रोजी शाळा उघडताच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तक पडणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शिक्षा अभियानकडून मोफत पाठ्यपुस्तक योजना २०१८-१९ अंतर्गत वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र औरंगाबाद यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्याला ७९.९७ टक्के मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. १५ जून रोजी शाळा उघडताच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तक पडणार आहेत.सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा उघडण्यापूर्वी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात. विविध विषयांची पाठ्यपुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाली असून लवकरच केंद्र व शाळा स्तरावर वाटप प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. जिल्ह्यात १ ली ते ८ वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५४ हजार ८६३ आहे. या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरावरून पुस्तकांची मागणी करण्याच्या सूचना होत्या. तालुका स्तरावरून मागणी केल्याप्रमाणे ६ लाख ५३ हजार ७५६ पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. इयत्ता पहिलीची पुस्तकांची छपाई सुरू आहे. त्यामुळे पहिल्या वर्गाची पुस्तके वगळता पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला आहे. लवकरच पहिल्या वर्गाचीही पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील, असे शिक्षण विभागाने सांगितले. शिक्षण विभागाला मागणी प्रमाणे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे पुस्तकांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. जवळपास ८० टक्केच पुस्तके उपलब्ध झाली आहेत. परंतु याबाबत नियोजन किंवा आवश्यकतेनुसार परत मागणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.हिंगोली तालुक्यात पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची संख्या ३४ हजार ५८८ असून या विद्यार्थ्यांसाठी १ लाख ८३ हजार ३२६ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यात १ ते ८ चे २४ हजार ६०५ विद्यार्थी असून १ लाख २९ हजार ६७० पाठ्यपुस्तकांची मागणी केली.सेनगाव तालुक्यात २६ हजार २४२ विद्यार्थी संख्या असून १ लाख ३७ हजार ९०३ पाठ्यपुस्तकांची मागणी आहे. कळमनुरी विद्यार्थी संख्या १२ हजार ८१८ असून १ लाख ५७ हजार ९६५ पुस्तकांची मागणी केली.वसमत तालुक्यात पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची ३९ हजार ६१० विद्यार्थी संख्या असून २ लाख ८६ हजार २ पुस्तकांची तालुकास्तरावरून मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदSchoolशाळा