शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

७४ उमेदवारी अर्जांची छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:26 IST

तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १९ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली.२० डिसेंबर रोजी अवैध ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले. येथील तहसील कार्यालयात १९ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलासचंद्र वाघमारे, सहाय्यक निबंधक बोलके यांनी ७४ उमेदवारी अर्जाची छाननी केली. आखाडा बाळापूर बाजार समितीच्या मतदार संघात १५ गण आहेत. या १५ गणात व्यापारी, हमाल, मापाडीसह ७४ उमेदवारी अर्ज आले आहेत. व्यापारी संचालकासाठी- ७, हमाल, मापाडी संचालकासाठी- ३ तर शेतकरी संचालकासाठी ६४ उमेदवारी अर्ज आले आहेत.१८ संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे. यात ५१ हजार ८१ मतदार आहेत. १३ जानेवारी रोजी ७६ मतदान केंद्रावर मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.रणखांब बिनविरोध?दरम्यान, सिंदगी गणात एकमेव अनिल रणखांब यांचाच अर्ज छाननीनंतर शिल्लक राहिल्याचे सांगितले जात असून ते बिनविरोध निघाल्याने सत्काराचे कार्यक्रमही होत आहेत. प्रशासनाने मात्र अधिकृतरीत्या काहीच सांगितले नाही. रणखांब हे काँग्रेस-राकाँ आघाडीचे आहेत.डोंगरकडा गणात सर्वाधिक अर्ज ...आखाडा बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापुर ची निवडणूक आता जोरदार रंगात आली आहे. शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण ७४ उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पुढे आले आहे. यामध्ये सर्वाधिक रस्सीखेच डोंगरकडा गणात असून डोंगरकडा गणासाठी आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर त्याखालोखाल जवळा पांचाळ गणात सात, आखाडा बाळापूर गणासाठी ५ , शेवाळा गणासाठी ५, घोडा गण ४, कांडली गण पाच, वारंगा फाटा ४ ,डोंगरकडा ८, जवळा पांचाळ ७, दांडेगाव २, पेठवडगाव ३, सिंदगी ५, नांदापूर ४, पिंपळदरी २, जलालदाभा २, लाख २, कोथळज ५ तर व्यापारी गणासाठी ७ हमाल मापाडी गणासाठी ३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड