शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

जिल्ह्यात पुन्हा ६ जणांचा मृत्यू ; नवे २५५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

हिंगोली जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन चाचणीत ५६७ पैकी १३६ बाधित आढळून आले. यामध्ये हिंगोली परिसरात तिरुपतीनगर २, पोलीस क्वार्टर ४, ...

हिंगोली जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन चाचणीत ५६७ पैकी १३६ बाधित आढळून आले. यामध्ये हिंगोली परिसरात तिरुपतीनगर २, पोलीस क्वार्टर ४, रामाकृष्णानगर १,लाला लजपतराय नगर १, घोटा १, पिंपरखेड १, गायत्रीनगर १, जांभरुण तांडा १, रिसाला बाजार १, निशाना १, नांदेड १, एसआरपीएफ कॅम्प १, जिजामातानगर १, पोळा मारोती २, एनटीसी १, सिरसम २ असे एकूण २२ बाधित आढळले. वसमत परिसरात गिरगाव २९, हयातनगर ५, कुरुंदा ३, पांगरा शिंदे ३, टेंभूर्णी ७ व वसमत ६ असे एकूण ५३ रुग्ण आढळून आले आहेत. कळमनुरी परिसरात पोतरा २, रामेश्वर तांडा ११, कळमनुरी ८ तर आखाडा बाळापूर येथे १५ रुग्ण असे एकूण ३६ रुग्ण आढळून आले आहेत. औंढा परिसरात जवळा ११, लोहरा ३, शिरड १, औंढा ६ असे एकूण २१ रुग्ण आढळून आले आहेत. सेनगाव परिसरात गोंडा २, तळणी १, सिनगी १ असे एकूण ४ रुग्ण आढळून आले आहेत.

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात गणेशनगर १, केंद्रा, ता.सेनगाव १, नाईकनगर १, श्रीनगर १, यशवंतनगर २, कंजारा १, पेन्शनपुरा १, पोलीस क्वार्टर ४, डिग्रस कऱ्हाळे १, खानापूर १, विवेकानंदनगर १, टीव्ही सेंटर २, वरूड चक्रपान १, एनटीसी १, सवड १, शस्त्रीनगर २, देवगल्ली १, लोहरा खु. १ असे २४ बाधित आढळून आले. औंढा परिसरात पोटा १, कलगाव १, नालेगाव १, औंढा १ असे चार बाधित आढळले. वसमत परिसरात कौठा १, पारडी बागल १, हट्टा २, पौर्णिमानगर १, योगानंद कॉलेज १, डब्ल्यू. एच. क्वार्टर १, हिवरा २, कासारखेडा १, चौधरीनगर ५, शास्त्रीनगर ३, बालाजीनगर १, गणेशनगर २, बसस्थानकाजवळ १, पाटीलनगर १, लिंगी १, श्रीनगर १, सोनखेड १, शहरपेठ १, बोरगाव, नांदेड १, कुरुंदवाडी २, टाकळगाव १, अशोकनगर १, भोई गल्ली १ असे ३४ बाधित आढळले. सेनगाव परिसरात कोळसा १, सुकळी१, उटी १, वरूड १, मकोडी १ व सेनगाव ६ असे ११ बाधित आढळले. कळमनुरी परिसरात कुंभारवाडी २, पोतरा ४, डोंगरकडा ८, तोंडापूर १, सुकळीवीर २, साळवा १, जवळा पांचाळ १, पार्डी १, औंढा २, कळमनुरी ४, साळेगाव १, अकोला १, मंदापूर १, पाळाेदी१, सोडेगाव २, शेवाळा २, बाळापूर ९, कामठा १, कोंढूर १ असे ४६ रुग्ण आढळून आले.

आज कोरोनातून बरे झालेल्या १९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून ४०, लिंबाळा ३८, कळमनुरी ८४, सेनगाव १०, वसमत २० असे रुग्ण सोडण्यात आले.

आतापर्यंत ११२ मृत्यू

गुरुवारी एकाच दिवशी सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथील ६५ वर्षीय पुरुष, कुरुंदवाडी ता.वसमतचा ७३ वर्षीय वृद्ध, वडद, ता.औंढा येथील ५५ वर्षीय महिला, शेवाळा, ता.कळमनुरी येथील ६५ वर्षीय पुरुष, आखाडा बाळापूर, ता.कळमनुरी येथील ८५ वर्षीय पुरुष तर डोंगरकडा, ता.कळमनुरी येथील ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आता मृत्यूचा आकडा ११२ वर पोहोचला आहे.

सक्रिय रुग्णसंख्या हजाराकडे

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ७९८६ रुग्ण आढळले. यापैकी ६८८१ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. तर ९९३ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण आता हजारापुढे जाण्याची शक्यता आहे. यापैकी १८० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर अन्य २५ जण अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्यांची संख्या २०५ वर गेली आहे.